Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवराबायकोने हातात हात घालून डुबकी मारली, पाण्यातून बाहेर आला, रडायलाच लागला; म्हणाला, माझी बायको..

प्रयागराजच्या कुंभमेळ्यात लाखो भाविकांच्या गर्दीत अनेक जोडप्यांचा हात सुटल्याच्या घटना घडल्या आहेत. एक जोडपं गंगेत स्नान केल्यानंतर गर्दीत वेगळे झाले. पती आपल्या पत्नीचा अथक शोध घेत आहे, पण अद्याप ती सापडलेली नाही. कुंभमेळ्यात हरवले-सापडले केंद्र असले तरी अशा घटना चिंताजनक आहेत.

नवराबायकोने हातात हात घालून डुबकी मारली, पाण्यातून बाहेर आला, रडायलाच लागला; म्हणाला, माझी बायको..
Follow us
| Updated on: Feb 09, 2025 | 2:48 PM

कुंभमेळ्याचा उल्लेख होताच मनात अनेक फिल्मी कथा रुंजी घालतात. त्या भाऊ-भाऊ, आई-मुलगा, प्रियकर-प्रेयसींची गर्दीत ताटातूट झाल्याचं आपण ऐकतो. ताटातूट होण्याचं हे दृश्य आपण बॉलिवूडच्या अनेक जुन्या सिनेमात पाहिलं असेल.

लोकांच्या मनावरील हा फिल्मी पगडा दूर करण्यासाठी महाकुंभात मोठी तयारी करण्यात आली होती. हरवला-सापडला सारखे केंद्रही कुंभमेळ्यात तयार करण्यात आले होते. म्हणजे कुटुंबीयांना आपल्या नातेवाईकांना भेटणं सोपं व्हावं हा त्याचा हेतू होता.

तरीही एका व्यक्तीची त्याच्या पत्नीशी ताटातूट झाल्याचं आढळून आलं. हा माणूस त्याची पत्नी शोधण्यासाठी संपूर्ण कुंभमेळ्यात एकटाच वेड्यासारखा फिरत होता. पण त्याला काहीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे त्याच्या डोळ्याच्या कडाही रडून रडून सुजल्या होत्या.

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. या ठिकाणी देशविदेशातील लाखो भक्त आले आहेत. गर्दी वाढली तरी लोकांची आस्था काही कमी झालेली नाही. रोजच लाखो लोक त्रिवेणी संगमावर येत असून डुबकी घेत आहेत. 13 जानेवारीपासून आतापर्यंत 40 कोटी भक्तांनी गंगेत स्नान केलं आहे. कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्यानंतरही लोकांची गर्दी काही कमी झालेली नाही. लोकांचा ओढा येतच आहे. भक्ती आणि श्रद्धेपुढे सर्व गोष्टी फिक्या ठरल्या आहेत.

हात सुटला अन्…

या ठिकाणी एक जोडपंही आलं होतं. गंगेत स्नान करून साधूसंतांचा आशीर्वाद घेण्यासाठी हे लोक आले होते. आगऱ्यातील बाह परिसरातील ते राहणारे आहेत. दोघांनीही गंगेत डुबकी घेतली. पण त्यानंतर गर्दीत त्याचा पत्नीच्या हातातील हात सुटला. आणि काही क्षणात त्याची बायको अशा पद्धतीने बेपत्ता झाली की त्याला सापडलीच नाही. आता हा व्यक्ती त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याच्या पत्नीला शोधत आहे. पण तिची कोणतीच खबर त्यांना मिळाली नाही.

डोळे सूजले, पण…

चित्राहाटच्या सूरजनगरमधील कुर्ती सिंह भदौरिया आणि चंदावती हे दोघे नवरा बायको बुधवारी सकाळी गंगेत स्नान करण्यासाठी गेले. दोघांनीही एकमेकांचा हात पकडून गंगेत डुबकी घेतली. डुबकी घेतल्यानंतर बाहर निघाले तेव्हा गर्दीत दोघांचा हात हातातून सुटला होता. त्यामुळे चंदावती त्याच्यापासून दूर गेली. त्याने चंदावतीला शोधण्याचा अथक प्रयत्न केला. पण ती काही त्याला भेटली नाही.

अचानक चंदावती गायब झाल्याने त्याच्यावर जणू आभाळच कोसळलं. शेकडो लोकांना त्याने चंदावतीबाबत विचारलं. पण कोणालाच काही माहीत नव्हतं. पाण्यातही शोध घेतला पण चंदावती काही सापडली नाही. त्यामुळे त्याचा जीव थकला. रडून रडून डोळे सूजले पण त्याला चंदावती काही सापडली नाही. आजही त्याने चंदावतीला शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण ती त्याला सापडलीच नाहीये.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.