2022 Shravana Putrada Ekadashi | कधी आहे वर्षातील पहिली एकादशी ? जाणून घ्या, तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती

| Updated on: Jan 04, 2022 | 2:54 PM

पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पौष पुत्रदा एकादशी म्हणतात. ज्यांना संतती हवी आहे त्यांच्यासाठी हे व्रत खूप शुभ मानले जाते.

2022 Shravana Putrada Ekadashi | कधी आहे वर्षातील पहिली एकादशी ? जाणून घ्या, तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धती
Ekadashi
Follow us on

मुंबई : एकादशीचे व्रत हे हिंदू शास्त्रात सर्वोत्तम व्रतांपैकी एक मानले जातो. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. सर्व एकादशी भगवान विष्णूला समर्पित करण्यात आल्या आहेत. यानुसार या वर्षातील पहिली एकादशी 13 जानेवारी 2022 रोजी येणार आहे. या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. पुत्रदा एकादशी वर्षातून दोनदा येते, एक पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पौष पुत्रदा एकादशी म्हणतात. ज्यांना संतती हवी आहे त्यांच्यासाठी हे व्रत खूप शुभ मानले जाते.

एकादशीची शुभ वेळ

पौष पुत्रदा एकादशी 12 जानेवारीला दुपारी 4.49 वाजता सुरू होईल आणि 13 जानेवारीला सायंकाळी 7.32 वाजता संपेल. उदय तिथीनुसार हे व्रत 13 जानेवारीलाच ठेवण्यात येणार आहे.

पूजा पद्धत

जर तुम्ही हे व्रत ठेवणार असाल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करा. जेवणात कांदा लसूण इ.चे सेवन करू नये. एकादशीच्या दिवशी स्नान करून उपवासाचे व्रत करावे. या वेळी देवाला धूप, दिवा, फुले, अक्षत, रोळी, फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करून पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचावी. या दिवशी अन्नदान करावे.

उपवासाचे महत्त्व

ज्या दापत्यांना संततीप्रातीसाठी त्रास होत असेल तर त्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत अवश्य करावे अशी मान्यता आहे. तसेच जे लोक हे व्रत आपल्या मुलांच्या कल्याणासाठी ठेवतात, त्यांच्या मुलांना दीर्घायुष्यासह आयुष्यात खूप प्रगती होते.

एकादशी म्हणजे नक्की काय ?

प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अकरावी तिथी ‘एकादशी’ या नावाने ओळखली जाते. या तिथीला विष्णूची मनोभावे पूजा अर्चना केली जाते. एकादशीच्या बाबतीत ‘स्मार्त’ व ‘भागवत’ असे दोन संप्रदाय आहेत. ही तिथी दिनद्वयव्यापिनी असल्यास द्वादशीविद्धा वैष्णवांकरिता विहित आहे.

प्रत्येक महिन्याचे दोन भागात विभाजन केले आहे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. या प्रमाणे एकाच महिन्यात दोन वेळा ‘एकादशी’ घेते याप्रमाणे वर्षातून 24 एकादशी येतात. शुक्ल पक्षातील एकादश्यांची नावे : कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, पुत्रदा, जया व आमलकी. तर कृष्ण पक्षातील : वरूथिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, उत्पत्ती, सफला, षट्‌तिला, विजया व पापमोचनी. अधिक मासातील दोन्ही एकादश्यांना कमला असे नाव आहे.

संदर्भ-मराठी विश्वकोश

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या :

Paush Amavasya : कोणतंच काम नीट होत नाही? पितृदोष असू शकतात कारणीभूत, पौष अमावस्येला काही उपाय नक्की करुन पाहा

Vastu Tips | काहीही झालं तरी चालेल पण या 5 गोष्टी कधीच कोणाला वापरु देऊ नका, नाहीतर …

Vastu Tips | सावधान ! वास्तू दोष तुमच्या वैवाहिक जीवनात तेढ निर्माण करू शकतात, आजच करा योग्य ते बदल