AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Navami 2022 : जय श्रीराम! जाणून घ्या राम नवमीचे महत्त्व , पूजा विधी

आज राम नवमी (Ram Navmi) हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम (Ram) यांचा जन्म याच दिवशी झाला होता.

Ram Navami 2022 : जय श्रीराम! जाणून घ्या राम नवमीचे महत्त्व , पूजा विधी
ram navmi
| Updated on: Apr 10, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : आज राम नवमी (Ram Navmi) हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम (Ram) यांचा जन्म याच दिवशी झाला होता. म्हणूनच आजच्या दिवशी म्हणजेच दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची नवमीला हा हिंदूंचा प्रमुख उत्सव राम नवमी म्हणून साजरा केला जातो.भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी दिवशी पुनर्वसु नक्षत्रात आणि कर्क (Karak Rashi)राशीत झाला. रामनवमी देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी रामाची विशेष पूजा केली जाते. धार्मिक मान्यतांनुसार, भगवान श्रीरामाच्या कृपेने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. राम नवमी हा हिंदूंचा सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी हा सण साजरा केला जातो. यंदा राम नवमी 10 एप्रिलला येत आहे. हा दिवस भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान राम यांचा जन्म म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव अयोध्येचे राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांच्या मुलाच्या रुपात भगवान विष्णूचा अवतार म्हणून रामाचा जन्म साजरा केला जातो.

राम नवमी 2021 : तिथी आणि वेळ

नवमी तारीख 10 एप्रिल रोजी सकाळी 12:43 वाजता प्रारंभ होईल आणि 22 एप्रिल रोजी दुपारी 12:35 वाजता समाप्त होईल

राम नवमी 2021: महत्त्व

भगवान राम यांचा जन्म सूर्यवंशी इक्ष्वाकु वंशमध्ये त्रेता युगात राजा दशरथ आणि राणी कौशल्या यांचा पुत्र म्हणून अयोध्येत झाला होता. त्यांचा जन्म चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तारखेला झाला होता. हिंदू शास्त्रानुसार राम हे भगवान विष्णूचा सातवा अवतार आहे. म्हणून हा उत्सव देशभरातील हिंदूंमध्ये धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो.

राम नवमी 2021: शुभ मुहूर्त

राम नवमीचा मुहूर्त चैत्र शुक्ल नवमी तिथी सुरू होते – 10 एप्रिल, दिवस रविवार, 01:23 सकाळी चैत्र शुक्ल नवमी तिथी समाप्त होते – 11 एप्रिल, सोमवार, 03:15 am राम जन्मोत्सवाची शुभ मुहूर्त – सकाळी 11:06 ते दुपारी 01:39 पर्यंत

सुकर्मा योग रामनवमीच्या दिवशी दुपारी १२:०४ , पुष्य नक्षत्र राम नवमीला पूर्ण रात्रीपर्यंत. रामनवमीच्या दिवशी विजय मुहूर्त – दुपारी 02:30 – 03:21 PM रामनवमी दिवशी अमृत काल – 11:50 PM – 01:35 PM राहुकाल राम नवमीच्या

राम नवमी पूजा विधि

  1. या शुभ दिवशी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
  2. घरातील मंदिरात दिवा लावा.
  3. घरातील देवतांना स्नान केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
  4. भगवान रामाच्या मूर्तीवर किंवा चित्रावर तुळशीची पाने आणि फुले अर्पण करा.
  5. देवाला फळे अर्पण करा.
  6. जर तुम्ही उपवास करू शकत असाल तर या दिवशीही उपवास ठेवा.
  7. तुमच्या इच्छेनुसार सात्त्विक वस्तू देवाला अर्पण करा.
  8. या पवित्र दिवशी रामाची आरतीही करावी.

संबंधीत बातम्या

Zodiac | गुरू देणार आयुष्याला दिशा, 12 वर्षानी गुरू कराणार स्वामी राशीत प्रवेश

Chaita Navratri 2022 | चैत्र नवरात्रीत तुळजाभवानी मातेचे मंदिर रात्री 1 वाजता उघडण्याचा निर्णय

‘आई माऊलीचा उदो उदो’ जयघोषात एकविरा देवी उत्सवा निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.