AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : नितीन गडकरींनी पाठोपाठ रावसाहेब दानवेही राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चा तर युतीचीच होणार

काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर आता रावसाहेब दानवे यांनीही राज ठाकरेंची भेट घतली आहे, भाजप-मनसे युतीची चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली आहे का? अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

Raj Thackeray : नितीन गडकरींनी पाठोपाठ रावसाहेब दानवेही राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चा तर युतीचीच होणार
रावसाहेब दानवेंनी घेतली राज ठाकरेंची भेटImage Credit source: tv9
| Updated on: Apr 09, 2022 | 7:01 PM
Share

मुंबई : काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज ठाकरेंची (Raj Thackeray) भेट घेतली. त्यानंतर आता रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) यांनीही राज ठाकरेंची भेट घतली आहे, भाजप-मनसे युतीची चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली आहे का? अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण शिवतीर्थावर राज ठाकरेंनी घेतलीली हिंदुत्वाची भूमिका आणि त्यानंतर भाजप नेत्यांच्या वाढलेल्या गाठीभेटी, त्यामुळे अशा चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहेत. शायना एनसी यांचयासोबत राज ठाकरेंची भेट घेतली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ट्विटरवरून दिली आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्याच्या राजकारणात सध्या मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चेने जोर धरला आहे. मनसेबाबत आता भाजप नेत्यांचा सूरही पूर्वीपेक्षा बदललेला दिसतो आहे. त्यामुळे आगामी काळात युती होण्याची दाट शक्यता आहे.

रावसाहेब दानवे यांचं ट्विट

काही दिवसांपूर्वीच नितीन गडकरींची भेट

गुढी पाडव्याला शिवतीर्थावर राज ठाकरेंची वादळी सभा पार पडली. या सभेत हिंदुत्वाच्या मुद्यावरून राज ठाकरेंनी जोरदार भूमिका घेतली. तसेच मशीदीवरील भोंग्याविरोधत थेट हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच काढले. त्यानंतर भाजप नेते तेव्हापासून राज ठाकरेंचं चांगलचं कौतुक करत आहेत. त्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल होत राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळीच मनसे भाजपच्या युतीच्या चर्चाणा उधाण आले होते, मात्र नितीन गडकरी यांनी भेट घेऊन बाहेर आल्यानंतर ही पूर्णपणे वयक्तीक भेट असल्याचे सांगत, यात कुठलीही राजकीय चर्चा नाही, अशी माहिती दिली होती. त्यामुळे या चर्चा लांबणीवर गेल्या होत्या.

हिंदुत्व युतीची गाठ बांधणार?

मात्र आज पुन्हा रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसातच राज्यात अनेक मोठ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागत आहेत. त्यात मुंबई महापालिकेचाही समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसे भाजप युतीचे समीकरण हिंदुत्वाचा मुद्दा जुळवतो का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. येत्या काही दिवसातच याबाबत चित्र स्पष्ट होईल.

St Worker Protest : हे प्रकरण घडवून आणून सहानुभूती मिळवायची होती? पवारांना विचारा, अनिल बोडेंची CBI चौकशीची मागणी

Gunratna Sadavarte : शरद पवार, सुप्रिया सुळेंनी जमिनी बळकावल्या, त्या बाहेर काढल्या, त्याचाच वचपा सरकारने काढला, जयश्री पाटलांचा पवारांवर थेट आरोप

Gunratan Sadavarte : प्रत्यक्ष आंदोलन करणाऱ्या 109 जणांना न्यायलयीन कोठडी, सदावर्तेंना मात्र पोलीस कोठडी मिळाली कारण…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.