AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gunratan Sadavarte : प्रत्यक्ष आंदोलन करणाऱ्या 109 जणांना न्यायलयीन कोठडी, सदावर्तेंना मात्र पोलीस कोठडी मिळाली कारण…

आज झालेल्या सुनवाणीत कोर्टाने सदावर्तेंना कोठडी मुक्कामी पाठवलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी  (St Worker Protest) केल्या आंदोलनाप्रकरणी सादवर्ते यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर आक्रमक आंदोलन केलं होतं.

Gunratan Sadavarte : प्रत्यक्ष आंदोलन करणाऱ्या 109 जणांना न्यायलयीन कोठडी, सदावर्तेंना मात्र पोलीस कोठडी मिळाली कारण...
इतर आंदोलकांना न्यायालयीन कोठडीImage Credit source: tv9
| Updated on: Apr 09, 2022 | 5:39 PM
Share

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे (Gunratan Sadavarte)  वकील गुणरत्न सादवर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आज झालेल्या सुनवाणीत कोर्टाने सदावर्तेंना कोठडी मुक्कामी पाठवलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी  (St Worker Protest) केल्या आंदोलनाप्रकरणी सादवर्ते यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घराबाहेर आक्रमक आंदोलन केलं होतं. सदावर्ते यांनी केलेल्या भाषणामुळे हे आंदोलन भडकल्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांच्यावर करण्यात आलाय. कोर्टाबाहेर यावेळी मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी जमले आहेत. यात तब्बल 109 जणांना आरोपी करण्यात आलंय. सदावर्ते यांचा हल्ल्यात कोणताही प्रत्यक्ष सहभाग नव्हता, आणि घरात घुसू असेही सदावर्ते बोलले नाहीत, असा युक्तीवाद यावेळे सदावर्तेंचे वकील वासवानी यांनी केला आहे.

इतर आंदोलकांना न्यायालयीन कोठडी

प्रत्यक्ष आंदोलनात जे 109 आंदोलक सहभागी होते त्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे त्यांना जामीनासाठीही अर्ज करता येणार आहे. आज त्यांनी जामीनासाठीही अर्ज केला होता, कोर्टानं हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. मात्र गुणरत्न सदावर्तेंचा मार्ग आता आणखी खडतर होऊन बसला आहे. हे आंदोलन भडकवण्यात सदावर्तेंचा सहभाग कसा होता, सदावर्ते यांनी आणखी काही हलचाली पडद्यामागून केल्या होत्या का? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना ही कोठडी मिळाली आहे. इतर आंदोलकांच्या बाबतीत मात्र तसं करण्याची गरज नाही, असे समोर आले आहे. गुणरत्न सदावर्ते यांना कोठडीत औषधं देण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. मला उच्च रक्तदाब आणि मदूमेहाचा त्रास आहे, असे सदावर्ते यांनी कोर्टात सांगितलं आहे. गुणरत्न सादवर्ते यांची न्यायालयाने खुद्द तपासणीही केली आहे. त्यांना कुठे जखमा झाल्या आहेत का? त्यांना धक्काबुक्की झाली आहे का? याची पाहणी कोर्टाने केली आहे.

अनिल परबांचा इशारा

परिवहन मंत्री अनिल परब यांनीही यावरून इशारा दिला आहे. कायदा हातात घेतल्यावर काय होतं हे त्यांना कोर्टाने सांगितलं आहे. कायदा हातात घेतल्यावर कोणाचीही सुटका नाही, असा इशारा कोर्टाचा निर्णय आल्यानंतर अनिल परब यांनी दिली आहे. कोर्टात पाच महिन्यात त्यांचा एकही मुद्दा मान्य झाला नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचं अपयश लवण्यासाठी हे आंदोलन भडकवण्यात आलं, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.  तर पुढे त्यांच्यावर काय कारवाई होते हे कोर्ट ठरवेल आम्ही एसटी कशी सुरू होईल याकडे लक्ष देत आहोत, असे ते म्हणाले आहेत.

Gunratna Sadavarte: दिलासा नाही! गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, पवारांच्या घरासमोरील आंदोलन भोवलं

St Worker Protest : पवारांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कट, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा इशारा

रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतांचा नोंदवला जबाब

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.