Gunratna Sadavarte: दिलासा नाही! गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, पवारांच्या घरासमोरील आंदोलन भोवलं

Gunratna Sadavarte: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्या प्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे.

Gunratna Sadavarte: दिलासा नाही! गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, पवारांच्या घरासमोरील आंदोलन भोवलं
गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी
Image Credit source: tv9 marathi
कृष्णा सोनारवाडकर

| Edited By: भीमराव गवळी

Apr 09, 2022 | 5:21 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर हल्ला करण्यासाठी चिथावणी दिल्या प्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर त्यांना आज किला कोर्टात (court) हजर केले असता त्यांना 2 दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तसेच इतर 109 कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश सावंत यांच्या समोर ही सुनावणी झाली. न्यायाधीश सावंत यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हे आदेश दिले. सदावर्ते यांच्याबाजूने अ‍ॅड. महेश वासवानी यांनी युक्तीवाद केला. 110 एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने अ‍ॅड. संदीप गायकवाड यांनी बाजू मांडली. तर सरकारच्यावतीने सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला. कोर्टाच्या या निर्णयानंतर इतर एसटी कर्मचाऱ्यांना जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करता येणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर प्रचंड निदर्शने केली होती. या आंदोलकांनी पवारांच्या घराच्या दिशेने चपलाही फेकल्या होत्या. त्यानंतर रात्री उशिरा एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. आज सकाळी त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आलं. सदावर्ते यांना कोर्टात आणण्यात येणार असल्याने कोर्टाच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परिसरात इतरांना प्रवेश मज्जाव करण्यात आला होता. तसेच मोबाईल नेण्यासही बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर कोर्टात तिन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. सुमारे तीन तास हा युक्तिवाद झाला. त्यानंतर निकालाचं वाचन सुरू झालं. इतर 109 जणांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना जामिनासाठी अर्ज करता येणार आहे.

एफआयआरमध्ये काय?

सदावर्ते यांच्या विरोधातील एफआयआरमध्ये अनेक गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. सदावर्ते यांनी 7 एप्रिल रोजी चिथावणीखोर भाषण केलं होतं. त्यात त्यांनी शरद पवार यांना टार्गेट केलं होतं. 12 तारखेला आम्ही बारामतीत येऊ, घरी राहून दाखवा, असं आव्हानच सदावर्ते यांनी पवारांना दिलं होतं. सदावर्ते यांनी आझाद मैदानात आधी जल्लोष करून नंतर कर्मचाऱ्यांची माथी भडकवल्याचा आरोप या एफआयआरमध्ये नोंदवला आहे. तसेच सरकारी कामात अडथळा आणणे आणि परवानगी शिवाय इतरांच्या घराच्या परिसरात घुसखोरी करण्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. या शिवाय आंदोलनाच्या दिवशी काही आंदोलकांनी मद्यप्राशन केलं होतं, असंही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या:

St Worker Protest : पवारांच्या घरावर हल्ला हा सुनियोजित कट, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना राष्ट्रवादीचा इशारा

Pravin Darekar : सोमय्यानंतर प्रवीण दरेकरांनाही पोलिसांची नोटीस, मुंबै बँक प्रकरणात पुन्हा चौकशी होणार

रश्मी शुक्ला फोन टॅपिंगप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतांचा नोंदवला जबाब

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें