Horoscope Of 03 April 2021 | मेष राशीला घर खरेदीचे योग, मकर राशीला करिअरमध्ये प्रगती, तुमचं राशीभविष्य काय सांगतं?

आज शनिवार 03 एप्रिल 2021 ला तुमचं राशीभविष्य काय सांगतं? कुणाला फायदा होणार, कुठल्या राशीला काय मिळणार, चला जाणून घेऊ… (Rashifal Of 03 April 2021 Horoscope Astrology Of Today)

Horoscope Of 03 April 2021 | मेष राशीला घर खरेदीचे योग, मकर राशीला करिअरमध्ये प्रगती, तुमचं राशीभविष्य काय सांगतं?
Horoscope

मुंबई : आज शनिवार 03 एप्रिल 2021 ला तुमचं राशीभविष्य काय सांगतं? कुणाला फायदा होणार (Rashifal Of 03 April), कुणाला सावध राहावं लागणार, कुठल्या राशीला काय मिळणार, चला जाणून घेऊ… (Rashifal Of 03 April 2021 Horoscope Astrology Of Today)

मेष

आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. तुम्ही बर्‍याच दिवसांपासून काम करत असलेल्या एखादी गोष्ट आज पूर्ण होईल. आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. नवीन घर खरेदी करण्याचे योग आहेत. सकारात्मक उर्जेचा फायदा होईल. व्यवहार काळजीपूर्वक करा. आनंदी रहाल.

वृषभ

आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. ऑफिसमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी ताण येऊ शकतो. एखाद्या जुन्या मित्राची गाठ-भेट होईल. आजचा दिवस व्यस्त जाईल. विरोधकांपासून सावध रहा. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका.

मिथुन

आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार राहा. दिवसभरात कोणासोबत वाद निर्माण होऊ शकतो. धार्मिक कार्यात भाग घ्यालं. तुम्हाला शुभ माहिती मिळेल. आनंदी राहाल. नोकरीनिमित्त बाहेर जाण्याची संधी मिळेल शकते.

कर्क

विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. यश तुमच्याबरोबर आहे. वैवाहिक जीवन सुखी होईल. अडचणी सुटतील. कार्यालयात मतभेद होऊ शकतात. आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवा. रागावू नका. वाहन काळजीपूर्वक चालवा. आजचा दिवस मिश्रित दिवस असेल. विचारपूर्वक खर्च करा

सिंह

आज तुम्हाला थोडा ताण येईल. आवश्यक नसलेली एखादी वस्तू खरेदी करू शकता. आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. अनावश्यक खर्च करू नका. वृद्धांची काळजी घ्या. जोडीदारासोबत फिरण्याचे योग आहेत. अज्ञात लोकांपासून सावध रहा. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. (Rashifal Of 03 April 2021 Horoscope Astrology Of Today)

कन्या

तुमची प्रकृती चांगली राहिल. कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी व्हालं. तुम्हाला आयुष्यात नवीन गोष्टींचा अनुभव मिळेल. कौटुंबिक कार्यक्रमाच्या संदर्भात इतर शहरांत जाण्याचे योग येतील. नातेवाईकांना भेटाल. व्यवसायात प्रगती होईल. सुख-समृद्धी वाढेल. दिवस चांगला जाईल.

तूळ

आज आपण नातेवाईकांना भेटू शकता किंवा चर्चा करु शकता. जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याची प्लॅन कराल. तब्येत ठीक असेल. शत्रूचं वर्चस्व असू शकते. घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगा. एखाद्या सामाजिक कार्याची जबाबदारी मिळू शकेल. कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मतभेद होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक

आज आरोग्य ठीक राहील. मुलांबरोबर फिरायला जाऊ शकता. कोणाशीही आपल्या गुप्त गोष्टींबाबत चर्चा करु नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. देवाची उपासना करा. वृद्धांची सेवा करा. जमीन मालमत्तेचे वाद मिटू शकतात. एखाद्याच्या बोलण्यामुळे तणाव येऊ शकतो. आर्थिक परिस्थिती ठीक असेल.

धनू

तुमची जवळची व्यक्ती आज तुम्हाला दुखावू शकते. विवाहित नागरिकांना सासरच्या लोकांच्या पसंतीचा फायदा होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कार्यक्रमास मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह सहभागी व्हाल. जोडीदारासह फिरायला जाऊ शकता. काम चांगले झाल्याने तणाव दूर होईल.

मकर

आजचा दिवस फायदेशीर ठरेल. कोणत्याही जुनाट आजारापासून मुक्ती मिळेल. आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना फायदा होईल. करिअरमध्ये प्रगती होईल. अनावश्यक खर्च टाळा. नव्या नोकरीसाठी आपल्या कुटुंबाला विश्वासात घेण्याची योग्य वेळ आहे. जोखीम घेऊ नका. प्रवास करताना सावधगिरी बाळगा.

कुंभ

शांततेत आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत रहा. यश मिळण्यापूर्वी कोणालाही माहिती देऊ नका. एखादी जवळची व्यक्ती तुम्हाला मदत करु शकते. आपल्या जोडीदाराशी चांगले संबंध असतील. वृद्धांना आरोग्याचा त्रास होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल. काम वेळेवर पूर्ण करा

मीन

आज व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. कुटुंबात सुख-शांती राहील. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. धार्मिक यात्राने मानसिक शांती लाभेल. ऑफिसमधील मित्र फायद्याचे ठरतील. देवी कालीची पूजा करा. (Rashifal Of 03 April 2021 Horoscope Astrology Of Today)

संबंधित बातम्या : 

प्रेमासाठी मुलाने चक्क तोडून आणला चंद्राचा तुकडा, Viral Video पाहून तुम्ही पोट धरून हसाल…

Fact Check | दिल्ली विमानतळावर अजय देवगणला मारहाण? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागचं सत्य…