Horoscope 19th March 2021 : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचं भविष्य

Namrata Patil

Updated on: Mar 19, 2021 | 9:41 AM

चला जाणून घेऊ आजचं राशीभविष्य (Rashifal Of 19 March 2021 Horoscope Astrology Of Today)

Horoscope 19th March 2021 : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचं भविष्य
Horoscope

मुंबई : आज शुक्रवार 19 मार्च 2021… दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. आजच्या शुक्रवारी तुमचं राशीभविष्य काय सांगतं? कुणाला फायदा होणार (Horoscope Of 19 March), कुणाला सावध राहावं लागणार, कुठल्या राशीला काय मिळणार? याबद्दल चला जाणून घेऊ…

मेष

आज कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. विरोधकांवर यशस्वीरित्या मात कराल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद आज मिटू शकतात. आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा. खर्च वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. फिरायला जाण्याचा प्लॅन होऊ शकतात.

वृषभ

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली काम आज सहज पूर्ण होतील. आज कुटुंबासोबत वेळ घालवाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. ऑफिसमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळेल. शासकीय कामे पूर्ण होतील. आज कोणताही प्रश्न सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आरोग्य चांगले राहील.

मिथुन

आज आपल्या गरजा सहजपणे पूर्ण होतील. जुन्या मित्रांशी भेटू होऊ शकते. व्यवसाय क्षेत्रात नवीन योजना राबवता येईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आरोग्याबाबत तक्रारी जाणवतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. मुलांबरोबर वेळ घालवाल.

कर्क

कुटुंबातील सदस्यांशी मिळून मिसळून वागाल. आर्थिक स्थिती सुधारेल. आजचा दिवस सामान्य असेल. घरातील वडीलाधाऱ्यांच्या आरोग्यची काळजी घ्या. आपल्या जोडीदाराबरोबर चांगल्या आणि वाईट गोष्टी शेअर कराल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. ऑफिसमध्ये मतभेद होऊ शकतात. खाण्यापिण्यासंबंधित काळजी घ्या.

सिंह

ऑफिसमध्ये इतर सहकाऱ्यांची मदत मिळेल. नवीन प्रोजेक्टवर काम कराल. मित्रांना भेटून आनंद होईल. मित्र-मैत्रिणींसोबत फिरायण्याचे प्लॅन होतील. विचारपूर्वक बोला. वरिष्ठ नाराज होऊ शकतात. कोणतीही गुंतवणूक करु नका. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. (Rashifal Of 19 March 2021 Horoscope Astrology Of Today)

कन्या

विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कामासाठी परदेशात जाण्याचा योग आहे. गुंतवणूकीचे प्रस्ताव मिळू शकतात. कुटुंबात अडचणींचा सामना करावा लागेल. बाहेर खाताना काळजी घ्या. कायदेशीर बाबी पुढे होतील. अधिक खर्च होईल.

तूळ

आज एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक आणि मानसिक शांती मिळेल. आपण बर्‍याच दिवसांनी एखाद्या नातेवाईक किंवा मित्राशी भेट घ्याल. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतात. तरूणांची करिअरबाबत प्रगती होईल.

वृश्चिक

व्यवसायाचा निर्णय घेताना आपल्या जोडीदाराचा सल्ला घ्या. आजचा दिवस चांगला जाईल. आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. शासकीय कामे पूर्ण होतील. मालमत्तेच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतो. आज प्रवास करणे टाळावे. वादाचे प्रसंग टाळा.

धनू

आजचा दिवस चांगला जाईल. नफा मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला यश मिळेल. आपल्या योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घरातील वृद्धांची काळजी घ्या. अनावश्यक खर्चही होऊ शकतो. विद्यार्थ्यांना गुडन्यूज मिळू शकते. तरुण वर्गाने करिअरकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

मकर

वैवाहिक जीवन सुखी असेल. एखादी मोठी जबाबदारी पार पाडल्याने ताण कमी होईल. मौल्यवान वस्तूंचे रक्षण करा. कोणतीही कामे पुढे ढकलणे टाळा. ज्ञानी व्यक्तीला भेटेल. अविवाहित लोकांना विवाहचा योग आहे.

कुंभ

तरुणांच्या कारकीर्दीशी संबंधित चिंतांवर मात करता येईल. आजचा दिवस खूप व्यस्त असेल. देवाची उपासना केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. सावधानता बाळगावी. व्यवसायाची परिस्थिती चांगली राहील. वाहन काळजीपूर्वक चालवा. नवीन कामात तुम्हाला फायदा होऊ शकेल. कौटुंबिक समस्या सुटतील.

मीन

आज उधळपट्टी करु नका. विद्यार्थ्यांना अथक परिश्रम घ्यावे लागतात. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. वाढीव खर्चामुळे ताण येऊ शकतो. व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन कल्पना आखाल. अचानक एखाद्या मित्राशी गाठभेट होऊ शकते. (Rashifal Of 19 March 2021 Horoscope Astrology Of Today)

संबंधित बातम्या : 

ट्रेन तिकीट बुक करताना स्वस्तात बूक करा हॉटेल, IRCTC कडून धमाकेदार ऑफर

घर बसल्या 10 हजारात सुरू करा ‘हा’ बिझनेस, महिन्याला कमवाल 30 हजार रुपये

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI