Ravivar Upay: रविवारी केलेल्या या उपायांनी वाढते सकारात्मकता, समृद्धीचे मार्ग खुलतात

| Updated on: Aug 14, 2022 | 5:40 AM

प्रत्येक रविवारी सकाळी सूर्योदयापूर्वी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. यानंतर घरातील पूजेच्या ठिकाणी देवासमोर दिवा लावावा. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात चंदन आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे.

Ravivar Upay: रविवारी केलेल्या या उपायांनी वाढते सकारात्मकता, समृद्धीचे मार्ग खुलतात
रविवारची पूजा
Image Credit source: Social Media
Follow us on

शास्त्रांमध्ये ग्रहांचा राजा असलेल्या सूर्यदेवाच्या उपासनेला (Suryadev Upasna) खूप महत्त्व देण्यात आले आहे. रोज सूर्याचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभते. दुसरीकडे, धार्मिक मान्यतांनुसार रविवार (ravivar Upay) हा भगवान सूर्याला समर्पित मानला जातो. सनातन धर्मात असे मानले जाते की रविवारी काही विशेष कार्य केल्याने सौभाग्य, आरोग्य वाढते आणि  लक्ष्मीच्या कृपेने जीवनात संपत्ती टिकून राहते. चला तर मग जाणून घेऊया दर रविवारी काय करावे.

 

सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे

 

हे सुद्धा वाचा

प्रत्येक रविवारी सकाळी सूर्योदयापूर्वी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. यानंतर घरातील पूजेच्या ठिकाणी देवासमोर दिवा लावावा. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात चंदन आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. तसेच सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी अर्घ्य अर्पण करताना या मंत्राचा जप करावा – ओम सूर्याय नमः ओम वासुदेवाय नमः ओम आदित्य नमः.

 

तुळशीच्या रोपाची पूजा करावी

 

रविवारी तुळशी पूजनही खूप शुभ आहे. पण लक्षात ठेवा की रविवारी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करणे किंवा तुळशीचे पान तोडणे वर्ज्य आहे. त्यामुळे रविवारी संध्याकाळी पूजेच्या वेळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा. दर रविवारी असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि सुख-समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

 

 तुपाचा दिवा लावा

 

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक रविवारी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला  तुपाचा दिवा लावणे शुभ असते. असे मानले जाते की, यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख समृद्धी नांदते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)