
भारतीय संस्कृतीत स्वयंपाकघर हे देवी अन्नपूर्णाचे स्थान मानले जाते. येथे बनवलेले अन्न केवळ शरीराचेच नव्हे तर मन आणि आत्म्याचेही पोषण करते. म्हणूनच, वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराची दिशा, काही गोष्टींचे स्थान आणि तेथील स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. वास्तुशास्त्रानुसार, झाडू आणि पायपुसणे यामुळे देखील घरातील सकारात्म ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा अवलंबून असते. या दोन्ही गोष्टी जर अस्वच्छ असतील तर मात्र मानसिक ताण आणि आर्थिक संकट येऊ शकतं.
वास्तु: स्वयंपाकघरात या गोष्टी ठेवणे चांगले नाही
स्वयंपाकघरात कधीही झाडू ठेऊ नये. हे अन्नाच्या कमतरतेचे प्रतीक दाखवते. त्यामुळे सकारात्मक उर्जेचा प्रवाह थांबतो. यामुळे अन्नाची ऊर्जा नकारात्मक होऊ शकते ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. घरात अनावश्यक खर्च आणि आर्थिक असंतुलन दिसून येते.
पायपुसणे
असाच नियम आहे पायपुसणेबद्दल देखील. घाण झालेलं किंवा अस्वच्छ पायपुसणे कधीही घरात ठेऊ नये. अन्यथा नकारात्मक उर्जेचा प्रभाव वाढू शकतो.
झाडू आणि पायपुसणे कुठे ठेवावे?
घराच्या नैऋत्य कोपऱ्यात किंवा बाथरूमजवळ झाडू ठेवणे योग्य मानले जाते. झाडू कधीही उभा किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवू नका. साफसफाई केल्यानंतर, झाडू आणि पायपुसणे व्यवस्थित जागेत ठेवा. जेणेकरून त्यांचा इतर नकारात्मक परिणाम होणार नाही. स्वयंपाकघरातही झाडू ठेवू नका.
परंपरा आणि अनुभव काय सांगतात?
प्राचीन वास्तु ग्रंथांनुसार आणि पंडितांच्या अनुभवांनुसार, स्वयंपाकघरात सकारात्मक ऊर्जा असते. झाडू आणि पायपुसणीसारख्या गोष्टी या उर्जेचा नाश करू शकतात. झाडूची दिशा बदलल्याने अनेक कुटुंबांना त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचे जाणवले आहे. जर तुम्हीही नकळत स्वयंपाकघराजवळ झाडू आणि पायपुसणे ठेवले असेल तर तो ताबडतोब काढून योग्य ठिकाणी ठेवा. वास्तुशास्त्र हे केवळ दिशा आणि सजावटीबद्दल नाही तर ते घरातील ऊर्जा संतुलित ठेवण्याचे शास्त्र सांगते. जेव्हा स्वयंपाकघर शुद्ध असेल तेव्हाच अन्न शुद्ध राहतं आणि घरात समृद्धी येण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)