Horoscope 7 May 2022 : नातेवाईकांच्या भेटीमुळे घरातील वातवरण आनंदी,लग्नां संबंधी बोलणी होतील

आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया

Horoscope 7 May 2022 : नातेवाईकांच्या भेटीमुळे घरातील वातवरण आनंदी,लग्नां संबंधी बोलणी होतील
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

May 07, 2022 | 6:05 AM

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात (Astrology) 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां (Challenge)चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

कर्क –

जास्त वेळ धार्मिक कामत आणि समजसेवी संस्थेसंबंधित कामात जाईल. मुलांच्या बाबतीत काही शुभ बातमी मिळाल्याने कुटूंबात आनंदी वातावरण राहिल. धार्मिक कार्य घडण्याची शक्यता. अचानक जवळच्या नातेवाईकांच्या प्रकृती बाबत मोठा खर्च होऊ शकतो. ज्यामुळे तणावाचे वातावरण राहिल. तुमच्या महत्वाच्या कामात व्यत्यय येतील. कामाच्या ठिकाणी कोणतीही ऑर्डर पूर्ण करताना सावधानी बाळगा. जरासा निष्काळजीपणा देखील त्रासाचे कारण होऊ शकतो. चौकशीही होऊ शकते. नोकरदान लोकांनी काम करताना कामात अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.

लव फोकस – तणावाचे परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर पडतील. जास्त तणाव घेण्यापेक्षा परिस्थिती कशी सुधारता येईल याकडे लक्ष द्या.

खबरदारी – डायबिटीज असलेल्यांनी स्वत: च्या आरोग्याकडे लक्ष द्या. खाण्यापिण्याकडे आणि दिनक्रम संयमित ठेवण्याकडे लक्ष द्या. शुभ

रंग – लाल

भाग्यवान अक्षर – ल

अनुकूल क्रमांक – 6

सिंह –

घरात नातेवाईक येतील. नातेवाईकांच्या भेटीमुळे घरातील वातवरण आनंदी व प्रसन्न राहिल. जवळच्या व्यक्तिच्या लग्नां संबंधी बोलणी होतील. मौजमस्ती बरोबर घरातील समस्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांच्या त्रासात त्यांना मदत करा. जमिनी संबंधीत कोणत्याही प्रकारचे काम आज करू नका. कामाच्या ठिकाणी काही त्रास जाणवत असेल तर जवळच्या मित्राचा किंवा भावाचा सल्ला घ्या. जो तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकतो. त्याने तुम्हाला योग्य उपाय मिळतील. कर्मचाऱ्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका.

लव फोकस – वैवाहिक जीवन अर्थपूर्ण राहील. तुमच्या अडचणीत घरातील मंडळी पूर्णपणे सहकार्य करतील.

खबरदारी – जास्त तणाव घेऊ नका. त्याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या पाचन यंत्रावर पडू शकतो.

शुभ रंग – पांढरा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 9

कन्या –

जावळच्या नातोवाईकांच्या घरी धार्मिक कार्यासाठी जाण्याचा योग. बऱ्याच काळाने सख्या नातेवाईकांना भेटण्याचा योग. भेटीमुळे आनंद आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. त्याने तुम्ही तुमच्या कामात नव्या उत्साहाने लक्ष देऊ शकाल. बऱ्याचवेळा तुमच्या स्वभावात शंका आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, ती तुमच्यासाठी त्रासाचे कारण होऊ शकते. आज देखील जवळच्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वभावावर आणि वर्तणूकीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. व्यावसायिक क्षेत्रात मेहनतीनुसार योग्य परिणाम मिळतील. कामची क्वलिटी सुधारली तर जास्त आर्डर येण्याची शक्यता. सरकारी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे उच्च अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील.

लव फोकस – घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी घरातील गोष्टीत जास्त हस्तक्षेत करू नका. प्रेम संबंध चांगले राहतील.

खबरदारी – प्रकृती ठिक राहिल. कोणत्या प्रकारची चिंता करू नका. पण निष्काळजीपणा देखील करू नका.

शुभ रंग –  हिरवा

भाग्यवान अक्षर –

अनुकूल क्रमांक – 3

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें