
हिंदू धर्मात पंचक कधी आहे याबाबत माहिती घेतली जाते. कारण हा कालावधी अशुभ मानला जातो. या कालावधीत शुभ कार्य करण्यास मनाई असते. ऑगस्ट महिन्यातील 10 तारखेपासून पंचक सुरु होत आहे. हे पंचक पाच दिवस असणार आहे. पंचांगानुसार, 10 ऑगस्टला रात्री 2 वाजून 11 मिनिटांना पंचक सुरु होईल. हे पंचक 14 ऑगस्टला सकाळी 9 वाजून 6 मिनिटांपर्यंत असेल. हे पंचक रविवारी सुरु होणार आहे. त्यामुळे या पंचकाला रोग पंचक म्हंटलं जातं. हे पंचक अशुभ गणलं जातं. या कालावधीत मानसिक, शारीरिक त्रास होतो. इतकंच काय तर शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, पंचक काळात काही कामं करण्यास मनाई केली आहे. अन्यथा केलेल्या कामातून अशुभ फळ मिळू शकते. ‘अग्नि-चौरभयं रोगो राजपीडा धनक्षतिः।संग्रहे तृण-काष्ठानां कृते वस्वादि-पंचके।।’ पंचक दरम्यान आग, चोरीची भीती, आजारपण आणि कायदेशीर प्रकरणात अडकण्याची भीती असते. इतकंच काय तर आर्थिक स्थिती खराब होण्याची शक्यता असते. या काळात घरात गवत आणि लाकडं जमा करण्यासही रोखलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहातील चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदल करणारा ग्रह आहे. एक राशीत अडीच दिवस घालवल्यानंतर गोचर करतो. इतकंच काय तर 27 नक्षत्रांचा अधिपती असलेला हा ग्रह प्रत्येक दिवशी नक्षत्र बदल करतो. त्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर आणि मानवी जीवनावर पडतो. जेव्हा प्रत्येक महिन्यात चंद्र कुंभ आणि मी राशीसह धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती नक्षत्रातून जातो. तेव्हा पंचक लागते. या पंचकाची स्थिती कोणत्या वाराला सुरु झाली यावर असते. आता येणारं पंचक रविवारी असल्याने त्याला रोग पंचक म्हणतात.