
Sabarimala Temple Gold Case: हिंदू धर्मात पूजापाठ उपवास या सर्व गोष्टींना फार महत्त्व आहे. भारतात असे अनेक धार्मिक ठिकाणं आहेत, जेथे भक्त एकदा तरी दर्शनासाठी जात असतात. असंच एक मंदिर केरळ याठिकाणी देखील आहे. केरळच्या घनदाट जंगले आणि टेकड्यांच्या मध्ये वसलेलं शबरीमला मंदिर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याचं कारण मंदिराभोवती असलेलं गूढ आणि श्रद्धा… जिथे सोनं, सुरक्षा आणि परंपरा खोलवर गुंतलेल्या आहेत. भगवान अय्यप्पाला समर्पित हे मंदिर केवळ भक्तीचं केंद्रच नाही तर अनेक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक तथ्यांचा संगम देखील आहे. सोनं चोरीच्या प्रकरणामुळे सध्या चर्चेत असलेल्या शबरीमला मंदिराबद्दल अधिक जाणून घेऊया.
शबरीमला मंदिराची संपत्ती आणि मंदिरात असलेलं सोने हे नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. मंदिराचं व्यवस्थापन करणारे त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (TDB) च्या रिपोर्टनुसार, शबरीमला येथे शतकानुशतके भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या मोठ्या प्रमाणात वस्तू आहेत. यामध्ये सोन्याचे दागिने, नाणी यासारख्या भेटवस्तूंचा समावेश आहे.
नोव्हेंबर 2024 च्या एका रिपोर्टनुसार, मंदिरात 227 किलोग्राम सोनं आणि 2 हजार 994 किलोग्राम चांदी असल्याचं देखील सांगितलं जातं. पण शबरीमाला मंदिर प्रशासनाकडून याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण असं देखील मानलं जातं की, मंदिरात असलेलं कोट्यवधींचं सोन्याची किंमत कोट्यवधी रुपये आहे.
शबरीमला मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन प्रमुख मूर्त्यांची स्थापना करण्यात आली आहे, ज्यांना स्थानिक परंपरेत द्वारपालक म्हणून ओळखलं जातं. हे द्वारपालक मंदिराच्या रक्षकांचे प्रतीक मानले जातात. धार्मिक श्रद्धा अशी आहे की जोपर्यंत हे द्वारपाल कृपा राहते तोपर्यंत मंदिर आणि मंदिरातील मालमत्ता सुरक्षित राहते. नुकताच, मंदिराच्या गर्भगृहातील या द्वारपालांवर लावलेला सोन्याचा मुलामा गायब झाल्याच्या किंवा चोरीला गेल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. हा मुलामा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर आर्थिक दृष्टिकोनातूनही अत्यंत मौल्यवान होता. या घटनेनंतर, भाविकांच्या श्रद्धेची दखल घेऊन आणि मंदिराच्या सुरक्षा तपासणीनंतर, या द्वारपालांना शुद्ध सोन्याने पुन्हा मुलामा देण्यात आला.
केरळमधील प्रसिद्ध शबरीमाला मंदिरात भगवान अयप्पा यांची पूजा केली जाते. त्यांना अय्यपन, शास्ता किंवा मणिकंदन असंही म्हणतात.पौराणिक कथेनुसार, भगवान अय्यप्पा हे भगवान शिव आणि भगवान विष्णूचे स्त्री रूप मोहिनी यांचे पुत्र आहेत. म्हणूनच त्यांना हरिहरपुत्र असेही म्हणतात.
मंदिराला भेट देण्यासाठी, भाविकांना 41 दिवसांचा कडक उपवास करावा लागतो, ज्याला मंडलम व्रतम म्हणतात. मकर संक्रांतीला होणाऱ्या मकरविलक्कू पूजेचे विशेष महत्त्व आहे, ज्यामुळे लाखो भाविक मकरज्योती पाहण्यासाठी मंदिरात येतात.