शनैश्चरी अमावस्या : शनिच्या साडेसातीने त्रस्त आहात?, ‘हे’ उपाय करा, दूर होतील सर्व समस्या

हिंदू धर्मात फाल्गुन माहिन्यात योणाऱ्या अमावस्येचं खास महत्व आहे (Shanichari Amavasya). जर ही अमावस्या शनिवारच्या दिवशी येत असेल तर याचं महत्त्व आणखीचं वाढून जातं.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 9:51 AM, 9 Mar 2021
शनैश्चरी अमावस्या : शनिच्या साडेसातीने त्रस्त आहात?, 'हे' उपाय करा, दूर होतील सर्व समस्या
Shanidev

मुंबई : हिंदू धर्मात फाल्गुन माहिन्यात योणाऱ्या अमावस्येचं खास महत्व आहे (Shanichari Amavasya). जर ही अमावस्या शनिवारच्या दिवशी येत असेल तर याचं महत्त्व आणखीचं वाढून जातं. हा अमावस्या शनिवारच्या दिवशी येत असल्याने याला शनैश्चरी अमावस्या म्हटलं जातं (Shanichari Amavasya Know The Date And The Upay To Get Rid Of All Shani Dosh).

जो लोक शनि दोष, शनि साडेसाती किंवा शनिशी संबंधित इतर कोणत्याही समस्यांपासून पीडित असाल तर त्यांनी लोकांना शनैश्चरी अमावस्येच्या दिवशी काही उपाय करावे. मान्यता आहे की असं केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिच्या अशुभ प्रभावांपासून मुक्तता मिळते. यावेळी शनैश्चरी अमावस्या 13 मार्च 2021 रोजी येत आहे. चला जाणून घेऊ शनैश्चरी अमावस्येचे काही खास उपाय.

1. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात. पिंपळाच्या झाडात सर्व देवतांचा वास असतो असं मानलं जातं. त्यामुळे शनिच्या दुष्प्रभावापासून वाचण्यासाठी शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

2. शनिवारी शेंदूर आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि भगवान हनुमानाला लाल लंगोट अर्पण करा. हनुमानजी हे शनिदेवांचे परम मित्र मानले जातात. मान्यता आहे की जे लोक हनुमानजींची उपासना करतात, त्यांना शनिदेवामुळे कुठलीही अडचण येत नाही.

3. शनिदेवाला शमीचे झाडही खूप प्रिय आहे. शनैश्चरी अमावस्येला शमीच्या झाडाची पूजा करुन आणि त्याच्या जवळ दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि शनि संबंधित त्रासातून मुक्तता मिळते. शनि अमावस्येच्या दिवशी शमी वृक्षाच्या मुळाला काळा कपड्यात बांधून ते आपल्या उजव्या हाताला बांधल्यामुळे खूप फायदा होईल.

4. शनिवारच्या सकाळी कुठल्याही पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि 7 वेळा परिक्रमा करा. यानंतर हनुमानजींच्यासमोर चौमुखी दिवा लावा आणि पिंपळाच्या झाडाच्या खाली बसून हनुमान चालीसाचं पठण करा (Shanichari Amavasya Know The Date And The Upay To Get Rid Of All Shani Dosh).

5. शनिवारच्या दिवशी काळे जनावर जसे काळी गाय आणि काळा कुत्रा यांना मोहरीच्या तेलाने बनवलेला पराठा खाऊ घाला. तुम्हाला वाटेल तर चपातीला मोहरीचं तेल लावूनही खाऊ खघालू शकता.

6. शुक्रवारी 800 ग्राम काळी तिळ पाण्यात भिजवा. शनैश्चरी अमावस्येया येणाऱ्या दिवशी तिळ-गुळाचे लाडू बनवा आणि ते काळ्या घोड्याला खाऊ घाला. हा उपाय सतत आठ शनिवारपर्यंत केल्याने शनिच्या त्रासातून मुक्तता मिळते.

7. पिंपळाची 11 पानं घेवून स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. या पानांवर चंदनाने श्री रामचं नाव लिहा, त्यानंतर ही पानं हनुमानजींना अर्पित करा. पण ही पानं त्यांच्या चरणांमध्ये अर्पण करु नका कारण, हनुमानजी भगवान रामचे सर्वात मोठे भक्त आहेत. शक्य असल्यास या पानांना हार तयार करुन हनुमानजींना घाला.

Shanichari Amavasya Know The Date And The Upay To Get Rid Of All Shani Dosh

संबंधित बातम्या :

Mahashivratri 2021 | घरात शिवलिंग ठेवण्यापूर्वी वाचा महत्त्वाचे नियम, अन्यथा निर्माण होतील अनेक अडचणी!

Janaki Jayanti 2021 | राजा जनक नाही, रावणाची पुत्री होती माता सीता! वाचा काय सांगतं अद्भुत रामायण…