Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी आहे यावर्षीची षटतिला एकादशी? जाणून घ्या व्रत आणि पूजा विधी

षटतिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, षटतिला एकादशीच्या दिवशी विधीनुसार पूजा आणि उपवास केल्याने तुमच्या मनातील सर्व ईच्छा पूर्ण होण्यास मदत होते.

कधी आहे यावर्षीची षटतिला एकादशी? जाणून घ्या व्रत आणि पूजा विधी
Follow us
| Updated on: Jan 21, 2025 | 12:05 PM

षटतिला एकादशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र स्थान  आहे. दरवर्षी कृष्ण पक्षातील एकादशीला षटतिला एकादशीचे व्रत केले जाते. षटतिला एकादशीच्या व्रताच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. षटतिला एकादशीच्या दिवशी नियमित व्रत केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व ईच्छा पूर्ण होतात. धार्मिक मान्यतेनुसार, षटतिला एकादशीला मनापासून उपवास आणि व्रत केल्यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. षटतिला एकादशीच्या दिवशी तुळशी पूजेलाही विशेष महत्त्व दिले जाते.

षटतिला एकादशीला व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सुख आणि सौभाग्य वाढते. त्यासोबतच षटतिला एकादशीचे व्रत केल्यास तुमच्या जीवनातूल सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. हिंदू वैदिक कॅलेंडरनुसार, यंदाची षटतिला एकादशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला म्हणजेच 24 जानेवारी शुक्रवार रोजी संध्याकाळी 7.25 वाजल्यापसून ते 25 जानेवारी शनिवार रात्री 8:31 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 2025मध्ये 25 जानेवारीला षटतिला एकादशीचे व्रत केले जाणार आहे.

षटतिला एकादशी पूजा विधी :

षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नान करावे. त्यानंतर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि तुमच्या घरातील मंदिरासमोर बसून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. पूजा संपन्न झाल्यानंतर तुळशीजवळ देशी तुपाचा दिवा लावून आरती करावी. तुळशीमातेला सोळा श्रृंगाराच्या वस्तू अर्पण करा. त्यानंतर तुळशी मंत्रांचा जप करावा आणि तुमच्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी.

तुळशीची पूजा करताना ‘या’ मंत्रांचे जप करा :

1) महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी, आधि व्याधि हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते।।

2) तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी। धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।। लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्। तुलसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।

3) तुलसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी। धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।। लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्। तुलसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं
VIDEO : 'बोललं की माझं तोंड दिसतं', अजितदादांनी बांधकाम विभागाला झापलं.
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार.
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार.
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल.
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?.
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्...
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्....