AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेडरूममध्ये आरसा लावावा का? जाणून घ्या अन्यथा नात्यात येतील अडचणी

आरशामध्ये खूप ऊर्जा असते, जो सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा साठवू ठेवू शकतो. बेडरूममध्ये चुकीच्या ठिकाणी आरसा ठेवल्यास नात्यांवर नकारात्मक परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार, बेडरूममध्ये आरसा जर थेट पलंगासमोर असेल तर ते शुभ मानले जात नाही. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

बेडरूममध्ये आरसा लावावा का? जाणून घ्या अन्यथा नात्यात येतील अडचणी
Should you put a mirror in your bedroom It is not considered auspicious according to Vastu and Feng Shui rulesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2025 | 7:42 PM
Share

अनेकांना घराच्या प्रत्येक भींतीवर आरसा लावण्याची आवड असते. अगदी किचनपासून ते बाथरूमपर्यंत सगळीकडे बरेच आरसे लावलेले दिसतात. काहीजण सजावट म्हणून आरसे लावतात तर काहीजण हव त्या आरशात आवरता यावं, किंवा सतत स्वत:ला आरशात न्याहाळता यावं यासाठी देखील आरसा लावतात. वास्तुशास्त्रातही आरशाचे बरेच उपाय, सकारात्मकता सांगतिलेली आहे. सोबतच नकारात्मकतेचीही एक बाजू सांगितली आहे.

घरात स्वच्छ आणि चांगला आरसा असणे शुभ

फार कमी लोकांना माहिती आहे की आरशामध्ये खूप ऊर्जा असते. तो इतका शक्तिशाली असतो की तो सर्व सकारात्मकतेप्रमाणे नकारात्मक ऊर्जा देखील साठवून ठेवू शकतो. घरात स्वच्छ आणि चांगला आरसा असणे शुभ मानले जाते, परंतु जर तो चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या दिशेने ठेवला तर तोच आरसा नकारात्मक ऊर्जाही देतो त्यामुळे घरातील नातेसंबंधांवरही खूप परिणाम होतो.

बेडरूममध्ये आरसा ठेवू नका

फेंगशुईच्या नियमांनुसार, बेडरूममध्ये कधीही आरसा असू नये असं म्हटलं जातं. जर ड्रेसिंग टेबल असेल तर ते नेहमी ड्रेसिंग रूममध्येच ठेवावे. खरं तर, बेडरूममध्ये आरसा ठेवल्याने पती-पत्नीमध्ये भांडणे होतात. जर तुम्हाला बेडरूममध्ये आरसा किंवा कपाट ठेवावं लागलं आणि त्यालाही आरसा असला तर तो थेट बेडसमोर न ठेवता अशा ठिकाणी ठेवावा जिथे झोपताना किंवा सतत तुमचे चेहरे दिसणार नाही.

कपलने तर त्यांचा बेड कधीही तो आरशात दिसतील अशापद्धतीने ठेवू नये. त्यामुळे घरात वाद-कटकट होऊ लागते. फेंगशुईनुसार, बेडरूममध्ये किंवा बेडसमोर कधीही आरसा ठेवू नये.

बेडरूमसमोर आरसा

जर तुम्हाला तुमच्या पलंगासमोर आरसा ठेवावा लागत असेल, तर नकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही. वास्तु आणि फेंगशुई नियम सांगतात, पण ते उपाय देखील देतात. जर तुमचा आरसा तुमच्या पलंगासमोर असेल, तर झोपताना तो कापडाने झाकून टाका. यामुळे आरशातून येणारी नकारात्मकता तुमच्यावर वाईट परिणाम करणार नाही.

या दिशेने आरसा ठेवा

फेंगशुईनुसार, योग्य दिशेने आरसा लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रातही याचा उल्लेख आहे. घराच्या किंवा रुमच्या ईशान्य कोपऱ्यात आरसा नेहमी ठेवावा. ही दिशा सर्वात शुभ मानली जाते. ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर आणि पूर्व. म्हणून, आरसा फक्त याच दिशेने ठेवा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही) 

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.