AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shravan 2022: श्रावणात अशा प्रकारे करा महादेवाची पूजा, पूजेचे नियम आणि महत्त्व

देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपवून योगनिद्रेत जातात. त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे.

Shravan 2022: श्रावणात अशा प्रकारे करा महादेवाची पूजा, पूजेचे नियम आणि महत्त्व
श्रावण पूजा Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 29, 2022 | 10:25 AM
Share

महादेवाच्या उपासनेसाठी श्रावण महिना सर्वोत्तम काळ मानला जातो. त्यामुळेच महादेवाचे भक्त वर्षभर या पवित्र महिन्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपवून योगनिद्रेत जातात. त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. शिवाचा आशीर्वाद देणारा श्रावण महिना आज 29 जुलै 2022 पासून सुरू झाला असून 26 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भगवान शंकराचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे भक्त श्रावण महिनाभर त्यांचे पूजन, जप, उपवास (Shrawan puja) करतात. कोणी त्यांना दूध अर्पण करून तर कोणी गंगाजल अर्पण करून प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. श्रावण महिन्यात, केव्हा, कोणत्या दिवशी आणि कोणत्या पद्धतीने तुम्हाला शिवपूजेचे पूर्ण फळ मिळेल, ते सविस्तर जाणून घेऊया.

श्रवणामध्ये कोणत्या पूजेने महादेव होतील प्रसन्न ?

भगवान शिवाला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात, दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा आणि दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून स्नान करा. श्रावण महिन्यात प्रदोष काळातच भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न करा, कारण या काळात पूजा केल्याने देवांचे देव महादेव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात. श्रावण महिन्यात शिवपूजनात गंगाजलासह महादेवाला प्रिय असलेले शमी आणि बेलपत्र अर्पण करा. ही दोन्ही पानं  नेहमी देठ तोडून उलटे अर्पण करावीत. श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध, दही, मध इत्यादी अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे. तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केल्याने विशेष फायदा मिळतो. शेवटी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराची अर्धीच प्रदक्षिणा करावी.

श्रावण महिन्यात अशी करा महादेवाची पूजा

श्रावण महिन्यात देवी सतीने दुस-या जन्मात कठोर नामस्मरण आणि उपवास करून महादेवाची प्राप्ती केली,  श्रावण महिन्यातील सोमवार व्रत करताना शिवपूजेशी संबंधित काही नियम सांगण्यात आलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकराच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर केलाच पाहिजे. असे मानले जाते की, भगवान शिवाचे सर्वात प्रिय गंगाजल अर्पण केल्याने, शिवभक्ताला अश्वमेध यज्ञासारखेच पुण्य प्राप्त होते. श्रावण महिन्यात महादेवासह पार्वती, गणपती, कार्तिकेय आणि नाग देवता यांची देखील अवश्य पूजा करावी.

श्रावण सोमवारच्या तारखा आणि शिवमूठ

  1. यंदा पहिला श्रावण सोमवार (First shravan somwar 2022) हा 1 ऑगस्ट रोजी येणार आहे. या दिवशीचे शिवपूजन शिवामूठ तांदूळ आहे. याशिवाय याच दिवशी विनायक चतुर्थी असल्याने अत्यंत शुभ दिवस आहे.
  2. दुसरा श्रावण सोमवार 8 ऑगस्टला येणार आहे. यादिवशीशी शिवपूजन शिवमूठ तीळ आहे. यादिवशी पुत्रदा एकादशीसुद्धा आहे.
  3. तिसरा श्रावण सोमवार 15 ऑगस्टला येणार आहे. या दिवशीची शिवपूजन शिवमूठ मूग आहे. याच दिवशी संकष्ट चतुर्थी असून 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनसुद्धा आहे.
  4.  चौथा श्रावण सोमवार 22 ऑगस्टला येतोय. या सोमवारची शिवपूजन शिवमूठ जव आहे. या दिवशी एकादशीसुद्धा आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार