
भगवान श्रीकृष्णाने महाभारत काळातच कलयुगातील काही भविष्यवाण्या केल्या होत्या. महाभारत आणि त्यातील गीता सारमध्ये या घटनांचे वर्णन आपल्या पाहायला मिळते. महाभारत काळात पांडव हे सर्वच काही हारले होते. त्यानंतर त्यांनी जंगलाचा मार्ग पत्करला. त्यावेळी पांडवातील सर्वातील ज्येष्ठ युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले की, हे नारायण, सध्या तर द्वापर युग सुरू आहे. यानंतर कलयुग येईल. तेव्हा कलियुगात काय घटना घडतील? भगवान श्रीकृष्णाने पांडवांना कलयुगात घडणार्या काही गोष्टींची माहिती दिली.
कलयुगात होणार शोषण
युधिष्ठिराने जंगलात दोन सोंडेचा हत्ती पाहिला. त्याची माहिती त्याने श्रीकृष्णाला दिली. त्यावेळी कलयुगात अशाच लोकांचा बोलबाला असेल जे दुतोंडी असतील, ते लोकांचे दोन्हीकडून शोषण करतील असे श्रीकृष्णाने सांगितले. सध्याची स्थिती यापेक्षा वेगळी आहे का?
कलयुगात राक्षसी वागणूक
अर्जुनाने जंगलात एक पक्षी पाहिला. त्याच्या पंखावर वेदाच्या ऋचा लिहिलेल्या होत्या. पण तो मेलेल्या जनावराचे मांस खात होता. कलयुगातील लोक स्वतःला ज्ञानी असल्याचा डंका पिटवतील पण त्यांची वागणूक राक्षसी असेल. या ढोंगी लोकांचा डंका असेल.
मुलांचा विकास खुंटणार
तर कलयुगात आई-वडिल मुलांच्या इच्छेसाठी मर मर करतील. अति लाडाने ते वाया जातील. दुसर्याचा मुलगा साधु झाला तर आया त्याच्या पाया पडतील. पण स्वतःच्या मुलाने संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्यास ओक्साबोक्शी रडतील.
भुकेल्याला कोणी नाही करणार मदत
कलयुगात एकमेकांना सहकार्य करण्याची प्रवृत्ती हळूहळू क्षीण होईल. जर कोणाची उपासमार होत असली तरी इतर लोक त्याला मदत करणार नाहीत. श्रीमंत वारेमाप संपत्ती उधळतील. शौक पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतील. पण ते गरिबांची मदत करणार नाही.
नाम जपाचा परिणाम
कलयुगात किती ही संपत्ती, सौंदर्य, दौलत, प्रसिद्धी मिळाली, व्यक्ती शिखारावर असला तरी त्याचे मन भरणार नाही. त्याची अभिलाषा, अमिष, लालसा कधीच कमी होणार नाही. तो हपापलेला राहिल. असा माणूस देवाचा नाम जप केल्याने पतनापासून थांबेल.
डिस्क्लेमर : उपलब्ध स्त्रोतावरून ही माहिती देण्यात आली आहे. त्याला टीव्ही ९ दुजोरा देत नाही.