22 नोव्हेंबरपासून 2 राशींच्या अडचणी वाढणार, तूळ राशीतील शुक्र 40 दिवस देणार अशुभ फळ
Venus Transit in Libra: २२ नोव्हेंबर २०२६ रोजी शुक्र ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार असून या गोचराचा परिणाम सर्व १२ राशींवर पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात २ राशींना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जाणून घ्या, कोणत्या आहेत या राशी आणि पुढील ४० दिवस कोणत्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे.

ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला सुख, संपत्ती, प्रेम आणि ऐश्वर्याचा कारक मानले जाते. येत्या २२ नोव्हेंबर २०२६ रोजी शुक्र स्वतःच्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शुक्र १ जानेवारी २०२७ पर्यंत म्हणजेच जवळपास ४० दिवस राहील. ज्योतिषीय मान्यतेनुसार, शुक्राचे हे गोचर अनेक राशींसाठी अनुकूल ठरू शकते. आर्थिक स्थिती, व्यवसाय, करिअर आणि प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे. मात्र, धनु आणि मीन या दोन राशींना या काळात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या राशींनी आर्थिक व्यवहार आणि महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
शुक्र गोचराचा जनमानसावर कसा परिणाम होईल?
शुक्राचे तूळ राशीतील गोचर जनमानसासाठी सकारात्मक संकेत देणारे मानले जाते. या काळात आर्थिक स्थिती सुधारण्यासोबतच ऐषारामाच्या वस्तू, नातेसंबंध आणि वैवाहिक जीवनात अनुकूल बदल होऊ शकतात. काही आरोग्यविषयक समस्यांमध्येही दिलासा मिळण्याची शक्यता ज्योतिषीय अंदाजात व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, गुंतवणुकीचे निर्णय घाईघाईने घेणे टाळावे.
या २ राशींनी राहावे सावध
शुक्राचे तूळ राशीतील गोचर बहुतांश राशींसाठी अनुकूल मानले जात असले, तरी धनु आणि मीन या दोन राशींनी पुढील ४० दिवस विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे ज्योतिषीय अंदाजात सांगण्यात आले आहे.
धनु रास
शुक्राच्या गोचरामुळे धनु राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चामुळे आर्थिक ताण जाणवू शकतो. त्यामुळे गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घाईने घेऊ नयेत. कौटुंबिक प्रश्न संयमाने सोडवण्याचा प्रयत्न करा आणि बोलताना शब्दांचा वापर जपून करा. जमीन, घर किंवा वाहन खरेदी करताना अडथळे येऊ शकतात. नोकरीत बढती मिळण्यासाठीही आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
मीन रास
मीन राशीच्या लोकांना या काळात व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. सुख-सुविधांमध्ये काही प्रमाणात कमतरता भासू शकते. त्यामुळे मोठी खरेदी करण्याचा निर्णय पुढे ढकलणे योग्य ठरू शकते. अनावश्यक प्रवास टाळा. तसेच कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यातील माहिती काळजीपूर्वक तपासून घ्या.
(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)