Surya Grahan Niyam : आजचं ग्रहण किती खास ? ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी

Rare Solar Eclipse 2026 : सूर्यग्रहण ही एक दु्र्मिळ खगोलीय घटना असते, ज्याचा काही राशींवर मोठा प्रभाव पडू शकतो. आज सूर्यग्रहणाच्या दिवशी काय घ्याल काळजी, कोणते नियम करावेत फॉलो ?

Surya Grahan Niyam : आजचं ग्रहण किती खास ? या गोष्टींची घ्या विशेष काळजी
Solar Eclipse 2026
| Updated on: Aug 12, 2026 | 10:16 AM

Solar Eclipse 2026 : सूर्यग्रहण हे एक दुर्मिळ आणि अत्यंत खास खगोलीय घटना असते. 12 ऑगस्ट रोजी जगातील अनेक भागांत सूर्यग्रहण (Solar Eclipse) दिसणार आहे. युरोप, ग्रीनलँड, आइसलँड आणि स्पेन यांसारख्या देशांमध्ये आज सूर्यग्रहण स्पष्टपणे दिसेल. ज्योतिषीय गणनेनुसार, हे ग्रहण कर्क राशीत आणि आश्लेषा नक्षत्रात होत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तसेच काही विशिष्ट राशींवर या ग्रहणाचा प्रभाव जाणवू शकतो, असं मानलं जातं. ग्रहणाचा परिणाम राशींच्या मानसिक आणि आर्थिक जीवनावर होऊ शकतो, त्यामुळे या काळात कोणतेही काम घाईघाईने करणं टाळावं. योग्य माहिती आणि सावधगिरी बाळगून हा दिवस नीट घालवणं योग्य ठरेल.

ग्रहणाचा प्रभाव आणि घ्यायची काळजी

आजच्या या पूर्ण सूर्यग्रहणाचा भारतावर थेट परिणाम होणार नसला, तरी ज्योतिषशास्त्रानुसार वेगवेगळ्या राशींच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडू शकतो. मुख्यतः त्याचा परिणाम मानसिक आणि आर्थिक जीवनावर होण्याची शक्यता मानली जाते. त्यामुळे या काळात कोणतेही मोठे किंवा महत्त्वाचे निर्णय घाईघाईने घेऊ नका. प्रत्येक गोष्ट नीट विचार करून मगच करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही.

तसंच ग्रहणाच्या काळात मन शांत ठेवणं अत्यंत आवश्यक मानलं जातं. कोणत्याही प्रकारच्या तणावापासून दूर राहून संयम राखावा. योग्य काळजी घेतल्यास ग्रहणाच्या काळात उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींपासून दूर राहता येतं, असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं.

ग्रहणाच्या काळात करावयाचा मंत्रजप

ग्रहणाच्या काळात मनःशांती टिकवून ठेवण्यासाठी धार्मिक नियमांचे पालन करणे शुभ मानलं जातं. या काळात मनातल्या मनात सूर्य गायत्री मंत्राचा जप करावा : ‘ॐ आदित्याय विद्महे मार्तण्डाय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयात्।’

याशिवाय महामृत्युंजय मंत्राचा मानसिक जप करणंही लाभदायक मानलं जातं. ग्रहणाच्या काळात मोठ्याने मंत्र म्हणण्याऐवजी मनातल्या मनात मंत्रजप करणे योग्य मानलं जातं. अशा प्रकारे मंत्रजप केल्याने मनात सकारात्मकता टिकून राहते आणि ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो, अशी धार्मिक मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us