AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : चुकीच्या माणसाच्या हातात सेनेचं चिन्हं…. सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान संजय राऊतांची सर्वात मोठी मागणी

Sanjay Raut on Eknath Shinde: शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. आज दुपारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित आहे. आज सकाळी खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी या घडामोडींवर त्यांचे स्पष्ट नोंदवले. त्यांनी आदिवासी विभागावरही निशाणा साधला.

Sanjay Raut : चुकीच्या माणसाच्या हातात सेनेचं चिन्हं.... सुप्रीम कोर्टात सुनावणीदरम्यान संजय राऊतांची सर्वात मोठी मागणी
चुकीच्या माणसाच्या हातात सेनेचं चिन्हं....राऊतांची सर्वात मोठी मागणीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Aug 12, 2026 | 10:25 AM
Share

शिवसेना कुणाची, पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचे यावर काल सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद करण्यात आला. यावरील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. आज दुपारी पुन्हा सुनावणीची शक्यता आहे. खासदार संजय राऊत यांनी या सुनावणीदरम्यान एक मोठे वक्तव्य केले आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे सेनेवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. तर काल गडचिरोली येथील आश्रमशाळेत सर्पदंशाने विद्यार्थी दगावल्या त्यावरून त्यांनी आदिवासी विभागासह परिस्थितीवर मोठे भाष्य केले.

आदिवासी खात्याच्या मंत्र्याला बरखास्त करा

गडचिरोली आश्रम शाळा प्रश्नावर खासदार संजय राऊतांनी आदिवासी खात्याच्या कारभारावर ताशेरे ओढले. काल जो विषय मांडला होता तो तळमळीने मांडला होता. आज समान मधे मी अग्रलेख देखील लिहिला आहे. आदिवासी खात्याला सरकार खूप बजेट देते. मात्र त्यांचेच पैसे सरकार ओरबडत आहे. स्वातंत्र्याचा सूर्य पाहिला नाही असे अनेक आदिवासी पाडे आहेत. खाण मालकांसाठी तुम्ही हे करत आहात हे गंभीर आहेत. अदानीच्या घशात तुम्ही अमरावती येथील जमीन घालत आहात, असा आरोप त्यांनी केला.

सर्पदंशाने गेलेल्या मुलींना सरकारने काय मदत केली माहीत नाही. त्या खात्याच्या मंत्र्याला बरखास्त केलं पाहिजे, अशी मागणी राऊतांनी केली. अत्राम, झिरवाळ काय करतात हा प्रश्न मुख्यमंत्री यांनी विचारला पाहिजे. बाकी उद्योग, नगरविकास यासह खात्यात लूट सुरूच आहे, तिथे दरोडेखोर बसलेले आहेतच. ती आश्रमशाळा कोणाची आहे हे उत्तर झालं का? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला. काँग्रेसची असो नाहीतर कोणाचीही असो. हाच नालायकपणा सरकारचा आहे १५०० मुल ट्रक खाली चिरडून मारले आहेत आणि पुरावे नष्ट केले आहेत, असा आरोप त्यांनी केला. खाण उद्योजकांसाठी हवा तसा जिल्हाधिकारी तिथे बसवल्याचा आरोप त्यांनी केला.

चुकीच्या माणसांच्या हातात सेनेचं चिन्ह गेले आहेत, ते अगोदर काढून घ्या

सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवर त्यांनी मत व्यक्त केलं. मी आतापर्यंतच्या सुनावणीवर समाधानी आहे. कोर्ट आमचं मत ऐकून घेत आहे. आम्हाला कुठलाही फेवर नको तर आम्हाला फक्त योग्य न्याय हवा आहे. आमची घटना अलोकतांत्रिक होती अस आम्ही मान्य करत नाही. असं असेल तर तुम्ही त्याची मान्यता रद्द करायला पाहिजे होती. अलोकतांत्रिक पक्ष संबंध नसलेल्या शिंदेंच्या हाती कसा दिला हा प्रश्न आहे. चिन्हाचा निर्णय कार्ट देईल. चुकीच्या व्यक्तीच्या हाती पक्ष गेला असेल तर कार्ट पहिला तो काढून घेईल. चोरी झाली त्याच्यात निवडणूक आयोग सामील झाला आहे, आमचा मुद्देमाल आम्हाला परत करा. चुकीच्या माणसांच्या हातात सेनेचं चिन्ह गेले आहेत, ते अगोदर काढून घ्या, अशी मागणी राऊत यांनी केली. खासदार नरेश म्हस्के हे कधीकाळी आमच्या सोबत होते. एकनाथ शिंदे यांच्या तक्रारी करण्यात सगळ्यात पुढे आधी म्हणजे होते. त्यांची पत्र तशी यापूर्वी पुढे आली आहेत, असे राऊत म्हणाले.

मोदी-शाह यांच्यावर टीका

संसदेचे कामकाज विरोधकांनी अडवून ठेवल्याचा आरोप होत आहे. त्यावर बोलताना कामकाज चालणार नाही. मोदी शाह घाबरले आहेत. त्यांची संसदेत येण्याचे धाडस होत नाही. त्यांच्याकडून एक मंत्री तडजोड करायला पुढे येतो.डिलीमिटेशन विधेयक येणार नाही, अमित शाह यांचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत. त्यांचा आकडा आणखी पूर्ण झालेला नाही. सुंभ जळला तरी पिळ कायम आहे. त्यांनी ३६० लोकांचा एक कागद तयार केला आहे. त्यामधे त्यांनी आमचे ३ , राष्ट्रवादीचे ८ खासदार पकडले आहेत. तर शिंदेंवर टीका करताना आमचे पक्ष आमचे आहेत त्यांच्या माता पित्याचे नाहीत, अशी टीका त्यांनी केली.

राज ठाकरे मुख्यमंत्री भेटीवर प्रतिक्रिया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. त्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. होऊ द्या ना, चुकीचं काय आहे. राज्याच्या मुख्यमंत्री यांना भेटणं चुकीच काय आहे? असा उलट सवाल त्यांनी केला. खड्ड्यांच्या बाबत त्यांनी भेट घेतली असेल. त्यांनी मुंबई गोवा रस्त्याची पाहणी केली आहे. आमचा नाशिक मधे खड्ड्यांचा बाबत मोर्चा आहे, देवेंद्र फडणवीस दिल्लीत जात असतील म्हणून त्यांना निरोप द्यायला गेलेले असतील, असा चिमटाही त्यांनी काढला.

Follow Us
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू