Spiritual: पिठापुरमचे ‘हे’ महत्त्व नाही अनेकांना माहिती; अनेकांना आला आहे चमत्कारिक अनुभव!

भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे (importance of Pithapuram). कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ असल्याची मान्यता आहे. हे गोदावरी जिह्यात आंध्र प्रदेशमध्ये सामालकोटाहून 12 कि.मी. दूर वसलेले छोटेसे गाव आहे (Pihapuram temple Location). सन 1320 साली श्रीपादांचा जन्म भाद्रपद शु. चतुर्थी (गणेश […]

Spiritual: पिठापुरमचे 'हे' महत्त्व नाही अनेकांना माहिती; अनेकांना आला आहे चमत्कारिक अनुभव!
नितीश गाडगे

|

Jun 19, 2022 | 11:25 AM

भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे (importance of Pithapuram). कुठल्याही मानवाच्या जीवनाची दिशा बदलणारे असे हे एकमेव शक्तीपीठ असल्याची मान्यता आहे. हे गोदावरी जिह्यात आंध्र प्रदेशमध्ये सामालकोटाहून 12 कि.मी. दूर वसलेले छोटेसे गाव आहे (Pihapuram temple Location). सन 1320 साली श्रीपादांचा जन्म भाद्रपद शु. चतुर्थी (गणेश चतुर्थी) च्या दिवशी कृष्णा यजुर्वेद शाखा, आपस्तंब सूत्र, भारद्वाज गोत्रोद्भव ब्रह्मश्री घंडिकोट अप्पल्लराजु शर्मा तथा अखंड सौभाग्य लक्ष्मी महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला. साधारणत सन 1983 साली पू. रामस्वामी यांनी एक लहानशी जागा खरेदी केली व सन 1985 साली त्या जागेमध्ये एक औदुंबराचे रोपटे लावले. तसेच सन 1887 साली भक्तांच्या देणगीतून जागा खरेदी केली व त्या जागेवर सुंदर व डौलदार असे मंदीर म्हणजे महासंस्थानाची स्थापना केली. सन 1988 साली 22 फेब्रुवारी रोजी श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मस्थानी म्हणजेच (श्री. बापन्नार्युलुच्या घरी) श्री गणपती व श्रीपाद पादुकांची स्थापना श्री. पू. रामस्वामींच्या हस्ते झाली. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या अक्षर सत्य ग्रंथात श्रीपादांनी असे सांगितले आहे की, जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदीर होणार व त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी श्रीपादांच्या पादुकांची स्थापना झाली.

या मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभांची, श्री दत्तात्रेयांची व श्री नृसिंहसरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मूर्ती आहेत.  मनमोहणारी व आकर्षणीय अशा काळ्या रंगाच्या श्रीपादांच्या पादुका आहेत व बाजुलाच औदुंबराचे झाड आहे. त्याच्या बाजुलाच श्री दत्तात्रेयांची काळ्या रंगाची मुर्ती व श्रींच्या पादुका आहेत. तेथील दृश्य फारच आनंदीदायक व शांतीदायक असे आहे. हे मंदीर पहाटे पाच वाजता उघडते व साधारणत सात वाजल्यापासून सर्व विधींची सुरूवात केली जाते. दुपारी साधारणत एक ते चारच्या दरम्यान जाळीच्या दाराने मंदीर बंद केले जाते. संध्याकाळी सात वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या तीन प्रदक्षिणा या मंदीराभोवती केल्या जातात. यावेळी सारे वातावरण अगदी प्रफुल्लीत होते. यावेळी भक्तांमार्फत श्रीपादांची इतर भजने तसेच पवित्र व सुखदायक सिध्द मंगल गायली जातात. या पालखी सोहळ्याचा आनंद उपभोगण्यासाठी व पालखी घेण्याचा लाभ भक्ताला मिळण्यासाठी त्या भक्ताने त्यावेळी स्वच्छ लुंगी व सोवळे नेसले पाहिजे. पालखी फुलांनी सजवलेली असते व पालखीत श्रीपाद श्रीवल्लभांची सुंदर चांदीची मुर्ती विराजमान असते. अतिशय सुंदर, दिव्य, मंगल वातावरण त्यावेळेस तेथे असते. आरती होऊन सर्व भक्तांना श्रीपादांच्या प्रसादाचे वाटप केले जाते.

पीठापुर हे पूर्व काळापासूनच सिध्द क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. आर्श्चयाची गोष्ट म्हणजे श्री कुक्कुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युतकांती प्रकाशत होती व त्यावेळी त्यातून अप्पलराजु शर्मा व सुमती महाराणी यांच्या विवाहाची आकाशवाणी झाली. या स्थानामध्ये एक तलाव असून तेथे रोज हजारो भाविक स्नान करतात. तसेच मृत पावलेल्या व्यक्तीचे पूर्ण श्रध्दाभावक पिंडदान केल्यास त्या आत्म्यास मुक्ती मिळते. या जागेलाच पादगया असे संबोधले जाते.

तसेच श्रीपाद श्रीवल्लभ या चरित्रामध्ये सांगितले आहे की, श्री अप्पलराजु शर्मा जेव्हा त्यांच्या घरातील कालाग्नीशमन दत्तात्रेयांची पूजा करीत असत व त्यानंतर त्या कालाग्नीशमन दत्तात्रेयांच्या लहान मुर्तीतून श्रीदत्तप्रभू मानवाच्या रूपात बाहेर येत व अप्पलराजुंच्या समोर बसून बोलत असत व श्रीदत्तप्रभु परत त्या लहान मुर्तीमध्ये विलीन होत असत. लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या पिठापुराम येथील सकारात्मक ऊर्जा अनुभवण्यासारखी असते.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें