Spiritual: ‘हे’ आहे कलयुगातले पहिले मंदिर; वैज्ञानिकही नाही उलगडू शकले ज्याचे रहस्य!

भारतात ठिकठिकाणी मंदिरे आहेत, त्यातील बरेच मंदीर आताच्या काळात बांधली गेली आहेत तर काही हजारो वर्षे जुनी आहेत. असे एक मंदिर देखील आहे ज्याच्या संदर्भात असे मानले जाते की, या मंदिराची स्थापना कलियुगाच्या पहिल्या दिवशी झाली होती (first temple in Kalyug). आपण ज्या मंदिराबद्दल बोलत आहोत ते दक्षिण भारतात आहे. त्याचबरोबर या मंदिराजवळ अमाप संपत्तीचा […]

Spiritual: 'हे' आहे कलयुगातले पहिले मंदिर; वैज्ञानिकही नाही उलगडू शकले ज्याचे रहस्य!
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 12:15 PM

भारतात ठिकठिकाणी मंदिरे आहेत, त्यातील बरेच मंदीर आताच्या काळात बांधली गेली आहेत तर काही हजारो वर्षे जुनी आहेत. असे एक मंदिर देखील आहे ज्याच्या संदर्भात असे मानले जाते की, या मंदिराची स्थापना कलियुगाच्या पहिल्या दिवशी झाली होती (first temple in Kalyug). आपण ज्या मंदिराबद्दल बोलत आहोत ते दक्षिण भारतात आहे. त्याचबरोबर या मंदिराजवळ अमाप संपत्तीचा खजिनाही (Treasure) आहे. या मंदिरात 2 लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सरकारच्या देखरेखीखाली या मंदिरातून सुमारे एक लाख कोटी रुपयांचा खजिना काढण्यात आला आहे. वास्तविक हे मंदिर केरळची राजधानी तिरुवनंतपुरमचे पद्मनाभम स्वामी मंदिर (padmanabhaswamy temple) आहे. 2011 मध्ये सरकारच्या देखरेखीखाली खजिना काढला असूनही या मंदिराचे एक तळघर अद्याप उघडलेले नाही. याला भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर देखील म्हटले जाते.कोब्रासारखे विषारी साप मंदिराच्या तळघरांमध्ये उपस्थित असल्याचे मानले जाते, जे या खजिन्याचे संरक्षण करतात आणि कोणालाही तळघरात प्रवेश करण्याची परवानगी देत नाही.

पद्मनाभ स्वामी मंदिराविषयी असे म्हटले जाते की, हे अत्यंत रहस्यमयी मंदिर आहे. या प्रसिद्ध मंदिराचा सातवा दरवाजा अजूनही एक कोडेच आहे, अशी लोकांची धारणा आहे. याचे कारण आजपर्यंत हा दरवाजा कोणीही उघडू शकला नाही. यात सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हा लाकडी दरवाजा उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे कुलूप, साखळी आणि नट-बोल्ट नाही, म्हणजेच दरवाजा बंद कसा? याविषयी कोणालाच काही माहिती नाही, जे आजपर्यंत एक गूढच आहे.

या मंदिराचे सध्याचे स्वरूप त्रावणकर राजांनी बांधले होते. असे म्हटले जाते की 1750 मध्ये त्रावणकरचे महाराज मार्तंड वर्मा यांनी स्वतःला पद्मनाभ स्वामींचे दास म्हणायचे, त्यानंतर संपूर्ण राजघराणे मंदिराच्या सेवेत गुंतले होते. मान्यतेनुसार मंदिरात फक्त त्रावणकोर राजघराण्याची संपत्ती आहे. असे म्हटले जाते की, त्रावणकोरच्या राजघराण्याने 1947 मध्ये हैदराबादच्या निजामाची मालमत्ता भारत सरकार ताब्यात घेत असताना मंदिरात त्यांची संपत्ती ठेवली होती. त्यानंतर त्रावणकोर संस्थानही भारतात विलीन झाले. या काळात संस्थानाची मालमत्ता भारत सरकारच्या अखत्यारीत आली, परंतु मंदिर राजघराण्याकडेच राहिले. एकूणच, राजघराण्याने अशा प्रकारे आपली संपत्ती वाचवली, परंतु या कथेचा कोणताही पुरावा आतापर्यंत समोर आलेला नाही. त्याच वेळी, आता हे मंदिर राजघराण्याने तयार केलेला ट्रस्ट चालवते.

हे सुद्धा वाचा

tresure

मंदिरावर हल्लासुद्धा झाला आहे

टिपू सुलताननेही या मंदिरावर हल्ला केला होता. असे म्हटले जाते की 1790 मध्ये टिपू सुलतानने मंदिर काबीज करण्यासाठी हल्ला केला होता, परंतु त्याला कोचीजवळ पराभवाचा सामना करावा लागला होता.

मंदिराची ओळख

हे मंदिर हजारो वर्षे जुने आहे, अशी प्रत्येकाची श्रद्धा आहे. परंतु प्रत्येकजण त्याच्या स्थापनेबद्दल एकमत नाही. या मंदिराच्या संदर्भात अनेक तज्ञांचे मत आहे की ते सुमारे दोन हजार वर्षे जुने आहे. तर त्रावणकोरचे इतिहासकार डॉ. एल.ए. रविवर्मा यांनी दावा केला आहे की या मंदिराची स्थापना लियुगाच्या पहिल्या दिवशी झाली होती. दुसरीकडे, मंदिरात असलेल्या भगवान विष्णूच्या मूर्तीच्या संबंधात, असे मानले जाते की ती कलियुगाच्या 950 व्या वर्षी स्थापित झाली होती.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.