स्वप्नात महाकुंभ मेळ्यात स्नान करताना पाहिलं तर काय असतात संकेत? जाणून घ्या
प्रयागराजमध्ये 12 वर्षानंतर महाकुंभ मेळा भरला आहे. साधुसंत या मेळ्यात शाहीस्नान करण्यासाठी आले आहेत. सामन्य नागरिकांनाही कुंभमेळ्यात स्नान करण्याचे वेध लागले आहेत. पण काहींना तिथे जाणं शक्य होत नाही. अशा स्थितीत तुम्हाला तर महाकुंभ मेळ्यात स्नान करण्याचं स्वप्न पडलं तर...

प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला 13 जानेवारीपासून सुरुवात जाली आहे. हा कुंभमेळा महाशिवरात्रीपर्यंत असणार आहे. 26 फेब्रुवारीला या कुंभमेळ्याचं समापन होईल. त्यामुळे कुंभ मेळ्याची संपूर्ण जगभर चर्चा आहे. देशविदेशातील भाविक मोठ्या आस्थेने या कुंभमेळ्यात हजेरी लावत आहे. पण प्रत्येकाला कुंभमेळ्यात जाणं शक्य होईलच असं नाही. त्यामुळे अनेकजण त्रिवेणी संगमातील पाणी घरी आणलं तर त्यानेच स्नान करतात. पण काहींच्या नशिबी तेही नसतं. पण तीव्र इच्छा असली की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून शाही स्नान केल्याचा भास होतो. काही जणांना शाहीस्नान केल्याचं स्वप्न देखील पडतं. पण या स्वप्नाचा नेमका अर्थ काय घ्यावा असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. महाकुंभ मेळ्यात स्वत:ला स्नान करताना पाहणं एक शुभ संकेत आले. स्वप्नशास्त्रानुसार पवित्र नदीत स्नान करणं शुभ मानलं गेलं आहे. भविष्यात आयुष्यात सकारात्मक गोष्टी होणार असल्याचे हे संकेत आहेत. महाकुंभ मेळ्यात स्नान करणं म्हणजेच आपण शुद्ध होत असल्याचा भाव आहे.
महाकुंभ मेळ्यात स्वत:ला स्नान करतानाचं स्वप्न पडणं म्हणजे आपण मानसिकदृष्ट्या शांत असल्याचं दर्शवतं. येत्या काही दिवसात आपल्या तणावग्रस्त जीवनातून सुटका होण्याची शक्यता असते. अनेक प्रकारचे चांगले अनुभव या स्वप्नानंतर तुम्हाला प्रत्यक्षात येऊ शकतात. स्वप्नात कुटुंबासोबत डुबकी मारता दिसलं तर कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण आहे समजून घ्या. जीवनात आपण ज्या मार्गावर आहोत त्यात काही सकारात्मक बदल होणार असल्याचं संकेत आहेत.
महाकुंभमेळ्यात तुम्ही फिरत असल्याचं स्वप्न पडलं असेल तर तेही शुभ संकेत आहे. त्रिवेणी संगमात डुबकी जरी लावली नाही तरी चालेल. पण महाकुंभमेळ्यात फिरत असल्याचं स्वप्न तितकंच शुभ मानलं गेलं आहे. याचा अर्थ तुम्ही ज्या मार्गावर आहात तो मार्ग चांगला आहे. तुम्ही आयुष्यात काहीतरी नवीन करणार असल्याचं यातून संकेत मिळतात. आपल्या जीवनात सकारात्मक बदल होणार असल्याचे संकेत आहेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)