Vastu tips for office : व्यवसायात प्रगतीसाठी ‘हे’ उपाय करा, नक्कीच भरभराट होईल; जाणून घ्या नशिब बदलणारे उपाय

| Updated on: Aug 10, 2021 | 8:27 AM

उत्तर-पश्चिम, दक्षिण-पश्चिम, पश्चिम, दक्षिण किंवा इतर कोणत्याही ठिकाणी बांधलेले तळघर कार्यालय कधीही शुभ मानले जात नाही. अशा कार्यालयात नेहमीच काही ना काही समस्या असते.

Vastu tips for office : व्यवसायात प्रगतीसाठी ‘हे’ उपाय करा, नक्कीच भरभराट होईल; जाणून घ्या नशिब बदलणारे उपाय
व्यवसायात प्रगतीसाठी ‘हे’ उपाय करा, नक्कीच भरभराट होईल
Follow us on

मुंबई : आयुष्यात असे काही प्रसंग येतात जेव्हा तुम्ही सर्व प्रयत्न करूनही यश मिळवण्यात अपयशी ठरता. जर तुमच्या व्यवसायाबाबत अशीच काही परिस्थिती असेल आणि तुमचे सर्व उत्पन्नाचे स्त्रोत बंद होत असतील तर तुमच्या नशिबाला दोष देत बसण्याऐवजी तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणच्या वास्तूमध्ये काय दोष आहे का ते एकदा नक्की बघा. तुमच्या कार्यालयाशी संबंधित वास्तूतील दोष दूर करण्यासाठी काही उपाय आहे. त्याच उपायांबद्दल आम्ही तुम्हाला येथे अधिक माहिती देत आहोत. हे उपाय केल्यानंतर नक्कीच चमत्कारिकपणे तुमचा व्यवसाय बहरू लागेल. यातून तुमच्या प्रगतीचा वेग तिप्पट ते चौपटीने वाढेल. (Take the this measure for business progress, it will surely prosper; know how to change luck)

1. कामाच्या ठिकाणी यश मिळवण्यासाठी नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसावे.

2. नेहमी तुमचा संगणक किंवा लॅपटॉप अशाप्रकारे ठेवा की त्याची स्क्रीन पाहताना तुमचा चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेला असेल.

3. वास्तुनुसार ऑफिसमध्ये बसलेल्या बॉसच्या ठिकाणी पाठीमागे एक खिडकी नसावी. तिथे पक्की भिंत असणे खूपच शुभ आहे.

4. भिंतीमध्ये बसवलेले घड्याळ नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेलाच ठेवावे.

5. कुणीही दरवाजासमोर, बीमच्या खाली आणि कार्यालयातील कॉरिडॉर किंवा रस्त्याच्या शेवटी कधीही बसू नये.

6. कार्यालयात रिकाम्या भिंतीकडे तोंड करून कधीही बसू नये.

7. तुम्ही तुमच्या कार्यालयात जितके अधिक बसाल, तितके ते तुमच्यासाठी चांगले असेल.

8. कार्यालयात नेहमी स्वच्छता आणि पुरेशा प्रमाणात प्रकाश पडेल, अशी व्यवस्था ठेवा.

9. तुमच्या ऑफिसच्या टेबलावर फाईल्सचा ढीग कधीही ठेवू नका.

10. आपल्या कार्यालयात टेलिफोन आणि फॅक्स मशीन नेहमी उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावी.

11. आपल्या कार्यालयाच्या दक्षिणेकडील भागात लाल बॉर्डरमध्ये रंगवलेला आपला एक चांगला फोटो लावा.

12. ऑफिसच्या ईशान्य कोपऱ्यात कधीही जड वस्तू ठेवू नका. हा भाग नेहमी शक्य तितका मोकळा आणि स्वच्छ ठेवा.

13. उत्तर-पश्चिम, दक्षिण-पश्चिम, पश्चिम, दक्षिण किंवा इतर कोणत्याही ठिकाणी बांधलेले तळघर कार्यालय कधीही शुभ मानले जात नाही. अशा कार्यालयात नेहमीच काही ना काही समस्या असते. (Take the this measure for business progress, it will surely prosper; know how to change luck)

इतर बातम्या

नागपुरात डेंग्यूचा कहर सुरूच, 383 घरांमध्ये अळी आढळल्या

45 झोपड्या, सहा मजली इमारतीवर हातोड, ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई