45 झोपड्या, सहा मजली इमारतीवर हातोड, ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई

ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज कळवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.

45 झोपड्या, सहा मजली इमारतीवर हातोड, ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई
45 झोपड्या, सहा मजली इमारतीवर हातोड, ठाणे महापालिकेची अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 11:40 PM

ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज कळवा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली आहे. तसेच यापुढेही कारवाई सुरुच राहणार आहे.

दिवसभरात ‘या’ ठिकाणी कारवाई

या कारवाई अंतर्गत कळवा प्रभाग समितीमधील जॅम फॅक्टरी लगत तळमजला अधिक 6 मजली अनधिकृत इमारतीचा स्लॅब आणि 4 कॉलम तोडण्यात आले. तसेच शिवशक्ती चाळ, इंदिरानगर येथे डोंगरावरील वन विभागाच्या जागेवर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या कच्चापकक्या बैठ्या 45 झोपड्यांवर वन विभाग आणि ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत सयुंक्तपणे निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

संबंधित निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त फारुख शेख, प्रणाली घोंगे यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने करण्यात आली.

लॉज आणि हॉटेलचं अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

ठाणे महापालिकेची गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई सुरु आहे. महापालिकेने 26 जुलैला अनधिकृत बांधकाम करुन जमीन बळकावणाऱ्या लॉज आणि हॉटेल व्यवसायिकांना दणका दिला. महापालिकेने वर्तकनगर प्रभाग समितीमधील लॉज आणि हॉटेलच्या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करत संबंधित लॉज आणि हॉटेल जमीनदोस्त केले होते.

दिवा-कळवा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

ठाणे महापालिकेने 24 जुलैला दिवा प्रभाग समितीमधील अली खान यांचे 60 ×90 मापाचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने तोडले होते. तसेच कळवा प्रभाग समितीमधील खारेगाव येथील सुमारे 2000 चौरस फुटाचे 36 कॉलमचे बांधकाम तसेच तळ अधिक 6 मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम जेसीबी तसेच मजुरांच्या साहाय्याने जमीनदोस्त केलं होतं.

दिवा, वर्तक नगरमधील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम सुरु आहे. याचदरम्यान 3 जुलैला दिवा प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीमधील वाढीव अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये करण्यात आली.

या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समिती येथील मुंब्रादेवी कॉलनी येथील 3 मजली इमारतीतील 4 थ्या मजल्याचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तसेच वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रांतर्गत पोखरण रोड क्र. 1, उपवन इंडस्ट्रीज प्लॉट न. 206 येथील रवी अच्युत पुजारी यांच्या 32 × 52 चौ. फूट मोजमाप असलेल्या जागेवर विटांची भिंत व लोखंडी अँगलची उभारणी करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. सदरचे बांधकाम आज जेसीबी मशीनच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आले.

हेही वाचा :

8 मजली इमारतीवर हातोडा, 14 खोल्या जमीनदोस्त, ठाणे महापालिकेची धडक कारवाई सुरुच

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.