AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

March Solar Eclipse 2025: वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण पुढच्या महिन्यात, तारीख आणि वेळ नीट नोंदवा

यंदा २०२५ मध्ये एकूण चार ग्रहणे होणार आहेत, ज्यात दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे आहेत. वर्षातील पहिले सूर्यग्रहण मार्च महिन्यात होणार आहे. मार्चमध्ये सूर्यग्रहण कधी आणि कोणत्या वेळी होणार हे पाहूयात...

March Solar Eclipse 2025: वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण पुढच्या महिन्यात, तारीख आणि वेळ नीट नोंदवा
| Updated on: Feb 09, 2025 | 9:54 PM
Share

March Surya Grahan 2025: यंदाच्या साल २०२५ मध्ये चार खगोलीय घटना घडणार आहेत. ज्यात दोन सुर्यग्रहण तर दोन चंद्र ग्रहण असणार आहेत. वर्षाचे पहिले सुर्यग्रहण एक खंडग्रास असणार आहे. हे सुर्यग्रहण पुढील महिन्यात मार्चमध्ये लागणार आहे. वर्षाचे पहिले सुर्यग्रहण २९ मार्चला होणार आहे. हे सुर्यग्रहण खंडग्रास म्हणजे अंशत:असणार आहे. चंद्र सुर्याच्या एका भागाला झाकणार आहे. त्यामुळे सुर्याचा अर्धा भागच दिसणार आहे तर अर्धा भाग चंद्रामुळे दिसणार नाही. परंतू हे सुर्यग्रहण भारतातून दिसणार नाही.

पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण लागतं. चंद्रामुळे सूर्याकडून येणाऱ्या प्रकाशाचा मार्ग अडवला जातो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. याला सूर्य ग्रहण असे म्हणतात.चंद्र किती टक्के सूर्याचा प्रकाश अडवतो यावरून ग्रहणाला खग्रास, खंडग्रास वा कंकणाकृती असे प्रकार पडतात. हे सुर्यग्रहण खंडग्रास आहे.हे सुर्यग्रहण यूरोप, आशिया, आफ्रीका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आणि अटलांटिक आणि आर्टीक्ट महासागराच्या काही भागातून दिसणार आहे.

यंदा दोन सूर्य ग्रहण

यंदाच्या साल २०२५ मध्ये दोन सुर्यग्रहण लागणार आहेत. यातील पहिले सुर्यग्रहण २९ मार्च रोजी तर दुसरे सुर्यग्रहण २१-२२ सप्टेंबरला होणार आहे. धार्मिक श्रद्धेनुसार ग्रहणाचा कालावधी अशुभ मानला जात असतो. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.

सूर्य ग्रहण २०२५ ची वेळ काय ?

भारतीय वेळनूसार, हे पहिले सूर्य ग्रहण दुपारी २.२१ वाजल्यापासून ते सायंकाळी ६.१४ वाजेपर्यंत असणार आहे. हे सुर्यग्रहण खंडग्रास असून सुर्य अर्धवटच झाकला जाईल. मीन राशी आणि उत्तर भाद्रपद नक्षत्रात हे ग्रहण लागणार आहे.

ग्रहणाबाबत काही महत्वाच्या बाबी –

सूर्यग्रहण केवळ अमावस्येलाच होते

सूर्यग्रहणाचे तीन प्रकार असतात

खग्रास, खंडग्रास, कंकणाकृती असे तीन प्रकार

कंकणाकृती सुर्यग्रहणास ‘रिंग ऑफ फायर’ असेही म्हणतात

खंग्रास ग्रहणावेळी सुर्य बिंब पूर्ण झाकल्याने दिवसा रात्रीसारखे वातावरण होते

खंग्रास सुर्यग्रहण केवळ सात मिनटांपर्यंत रहाते

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.