
असं म्हटलं जात की जर एखाद्या विशिष्ट कालावधीची सुरुवात चंद्रग्रहणासारख्या शीतल तत्वाने होत असेल आणि त्याची समाप्ती जर सूर्यग्रहणासारख्या अग्नी तत्वाने झाली तर या काळाला विशेष महत्त्व असते.धार्मिक दृष्ट्रीकोणातून हा काळ खास मानला जातो. या काळात तुम्ही जे पण काही कार्य कराल त्यामध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. यावेळी चंद्रगहणाच्या दिवशी एक खास योग बनत आहे. यंदा पितृपक्षाची सुरुवातच चंद्रगहणाने होत आहे. तसेच पितपक्षाची समाप्ती ही सूर्यग्रहणाने होणार आहे. त्यामुळे यावेळी पितृपक्षात एक खास योग बनत आहे.
धर्मशास्त्रानुसार जर पितृपक्षाची सुरुवात ही चंद्रग्रहणाने झाली आणि शेवट जर सूर्यग्रहणासारख्या अग्नी तत्त्वाने झाला तर हा योग खास योग बनतो. या काळात तुम्ही पितृदोष नष्ट होण्यासाठी जे काही उपाय कराल त्यांचं शंभर टक्के फळ तुम्हाला मिळणार आहे. यंदा पितृपक्ष दोन ग्रहणाच्या मध्ये आला आहे. पितृपक्षाची सुरुवात चंद्रगहणाने होणार आहे, तर शेवट हा सूर्यग्रहणाने होणार आहे. रविवारी सात सप्टेंबर रोजी रात्री 9:58 वाजता चंद्रग्रहणाला सुरुवात होणार आहे, तर 1:25 मिनिटांनी चंद्रग्रहण समाप्त होणार आहे.
तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आठ सप्टेंबर रोजी पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. तर 21 सप्टेंबर रोजी पितृपक्षाची समाप्ती होणार आहे. त्याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे. त्यामुळे या काळात एक विशेष योग तयार झाला आहे. पितृपक्षाच्या काळात तुम्ही दान, धर्म करू शकता, ज्यामुळे तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल, तुमची पितृदोषातून मुक्तता होईल. तसेच धर्मशास्त्रानुसार या काळात तर्पण देखील करावे, तुमच्या पित्रांना जल अर्पण करा यामुळे त्यांना मोक्ष प्राप्ती होईल, आणि पितृदोष दूर होईल. काही लोक तीर्थक्षेत्री जाऊन या काळात आपल्या पूर्वजांच्या नावाने पिंडदान देखील करतात.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)