घरात आर्थिक अडचण येण्यापूर्वी ज्योतिषशास्त्रानुसार मिळतात हे संकेत, दुर्लक्ष केलं तर…

वास्तुशास्त्रानुसार, घरात गरिबी येण्यापूर्वी काही संकेत दिसतात. ज्यामुळे घरात नकारात्मकता पसरते. चला तर मग या संकेतांबद्दल जाणून घेऊयात.

घरात आर्थिक अडचण येण्यापूर्वी ज्योतिषशास्त्रानुसार मिळतात हे संकेत, दुर्लक्ष केलं तर...
Horoscope
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 10:49 PM

वास्तुशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे. ज्याच्या मदतीने आपण वास्तू उभारतो. नवीन कार्य करण्यास नियमांचे पालन करतो. त्यासोबतच वास्तुशास्त्रामध्ये निरोगी जीवन जगण्यासाठीचे नियमही सांगितले आहेत. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आर्थिक संकट येणार असते, तेव्हा त्यांना आधीच काही संकेत मिळतात, ज्यांचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीने हे संकेत वेळेवर ओळखले, तर ते मोठे आर्थिक नुकसान टाळू शकतात. चला तर मग आर्थिक संकटापूर्वी दिसणाऱ्या या संकेतांबद्दल जाणून घेऊयात.

घरात दारिद्रय येण्यापुर्वी तुम्हाला मिळतात हे संकेत

  • तुळस सुकणे: सनातन धर्मात तुळशीच्या रोपाला पवित्र मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी देवी तुळशीच्या रोपात वास करते. तुळशीची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचे मातेच आगमन होते. तथापि जर तुळशीचे रोप वारंवार सुकत असेल तर ते आर्थिक संकटाचे लक्षण मानले जाते.
  • सतत गळत राहणारा नळ: घरातील बाथरूम असो वा बेसिंक यातीलनळातून सतत पाणी गळत असणे हे अशुभ मानले जाते. वास्तूनुसार नळातून गळत राहणारे पाणी हे वाढत्या कर्जाचे आणि संभाव्य आर्थिक संकटाचे लक्षण मानले जाते.
  • वारंवार काच फुटणे: घरात वारंवार काच फुटणे हे नकारात्मक ऊर्जा वाढल्याचे लक्षण मानले जाते. यामुळे कुटुंबात विविध समस्या निर्माण होऊ शकतात.
  • कौटुंबिक भांडणे: कुटुंबातील सदस्यांमध्ये वारंवार होणारी भांडणे हे आर्थिक घसरणीचे प्रमुख लक्षण मानले जाते.
  • दागिन्यांचे नुकसान: घरातून सोन्या-चांदीचे दागिने हरवणे हे देखील आर्थिक संकटाचे लक्षण आहे.
  • पैसा नसणे: भरपूर कमावूनही हातात पैसे न राहणे हे गरिबीचे लक्षण मानले जाते.
  • घरात लाल मुंग्यांचे होणे: घरात लाल मुंग्यांचे आगमन हे कर्ज वाढत असल्याचे लक्षण आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us