काळ्या तिळाचा हा उपाय आहे खूपच प्रभावी; झटक्यात दूर होईल शनिदोष, शनि देव राहातील प्रसन्न

हिंदू धर्मात शनिदेवांना न्यायाची देवता मानलं गेलं आहे, शनि देव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात, जर तुमच्या कुंडलीमध्ये शनिची स्थिती कमजोर आहे, तुम्हाला शनिची साडेसाती सुरू आहे, किंवा तुम्हाला शनिदोष आहे, तर काही असे उपाय आहेत, जे तुम्हाला या सर्वांपासून मुक्ती देऊ शकतात.

काळ्या तिळाचा हा उपाय आहे खूपच प्रभावी; झटक्यात दूर होईल शनिदोष, शनि देव राहातील प्रसन्न
| Updated on: Jun 27, 2025 | 1:12 PM

हिंदू धर्मात शनिदेवांना न्यायाची देवता मानलं गेलं आहे, शनि देव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात, जर तुमच्या कुंडलीमध्ये शनिची स्थिती कमजोर आहे, तुम्हाला शनिची साडेसाती सुरू आहे, किंवा तुम्हाला शनिदोष आहे, तर काही असे उपाय आहेत, जे तुम्हाला या सर्वांपासून मुक्ती देऊ शकतात, शनिदेव तुमच्यावर सदैव प्रसन्न राहातील. या उपयांसोबतच शनि देवांना प्रसन्न करण्यासाठी तुमच्या कामात प्रामाणिकपणा आणि तुमच्या उद्देशामधील शुद्धता देखील तितकीच महत्त्वाची आहे. जाणून घेऊयात या उपयांबाबत

शनिवारच्या दिवशी शनि मंदिरामध्ये जाऊन शनि देवांना काळे तीळ आणि तेलाचं अर्पण केल्यानं शनि देव शांत होतात अशी मान्यता आहे, तुम्ही जर दर शनिवारी हा उपाय केला तर शनि देव सदैव तुमच्यावर प्रसन्न राहातील, शनिदोष दूर होईल. शनिदोषामुळे येणाऱ्या सर्व नकारात्मक प्रभावातून तुमची सुटका होईल. प्रत्येक शनिवारी सुर्यास्तानंतर प्रदोष काळात शनिदेवांना तीळ आणि तेलाचं अर्पण केले तर ते अधिक लाभकारी ठरतं.

शनिदेवांच्या पूजेचा विधी

शनिवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून, अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा

एक तेलाचा दिवा तयार करा

त्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या जवळ असलेल्या शनि मंदिरात जा, जर घरा शेजारी किंवा जळपास शनि मंदिर नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली देखील तुम्ही हा उपाय करू शकता.

पिंपळच्या झाडामध्ये शनि देवाचा निवास असतो असं मानतात.

मंदिरात शनि देवांच्या मूर्तीवर किंवा शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करा

तेलाचा दिवा लावा आणि तो शनि देवांच्या मूर्ती जवळ किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा

शनि देवांना तीळ अर्पण करत असताना आणि दिवा लावत असताना शनि देवांच्या मंत्राचा जाप करा

अशा प्रकारची पूजा तुम्ही दर शनिवारी केल्यास तुमच्या आयुष्याती सर्व संकट शनि देव दूर करतील, तुमच्या आयुष्यातील सर्व प्रकारचे नकारात्मक प्रभाव नष्ट होतील, तुमची प्रगती होईल, अशी मान्यता आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)