AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh CM | आज कुछ खास हैं ! योगी आदित्यनाथ यांनी शपथविधीसाठी 25 मार्च हाच दिवस का निवडला ? जाणून घ्या यामागील ग्रहांचे रहस्य

राम भूमी उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) आज खूप महत्त्वाची घटना घडणार आहे. आज देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत. पण या दिवसाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय याबद्द्ल माहिती मिळवूया.

Uttar Pradesh CM | आज कुछ खास हैं ! योगी आदित्यनाथ यांनी शपथविधीसाठी 25 मार्च हाच दिवस का निवडला ? जाणून घ्या यामागील ग्रहांचे रहस्य
योगी आदित्यनाथ
| Updated on: Mar 25, 2022 | 2:25 PM
Share

मुंबई :  राम भूमी उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) आज खूप महत्त्वाची घटना घडणार आहे. आज देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत. आज म्हणजेच 25 मार्च (25 March) रोजी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत. आज म्हणजेच 25 मार्च रोजी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळा भव्यदिव्य करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.

लखनौच्या एकना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. असं असताना शपथविधीसाठी आजचा दिवस का निवडला यासाठी एकच चर्चा सुरु झाली आहे.

खरमासमध्ये शुभ कार्य करण्यास मनाई

वर्षातून दोनदा खरमास असतो. जेव्हा सूर्य धनु राशीत गुरु राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास योग तयार होतो. खरमास हा योग वर्षातून दोनदा येतो. पहिल्याला धनुर्मास आणि दुसऱ्याला मीन म्हणतात. म्हणजेच जेव्हा जेव्हा सूर्य बृहस्पति – धनु आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास किंवा मलमास म्हणतात . त्यामुळे विवाह आणि शुभ कार्यांशी संबंधित कार्य केले जात नाहीत , हा नियम प्रामुख्याने उत्तर भारतात पाळला जातो, तर दक्षिण भारतात हा नियम कमी प्रमाणात पाळला जातो.यादरम्यान घरबांधणी, मुंडन, विवाह असे कोणतेही संस्कार कार्य करत नाही अशी मान्यता आहे. पण या सर्व प्रतिकूल योगांमध्ये एक शुभ योगही तयार होत आहे. २४ मार्च रोजी बुध मीन राशीत आल्याने बुधादित्य योग तयार झाला आहे. याला ज्योतिषशास्त्रात राजयोग म्हणून संबोधलं जातं.

खरमाची आख्यायिका

लोककथांनुसार खरमास अशुभ महिना मानण्यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. धार्मिक मान्यतांनुसार, मार्कंडेय पुराणानुसार, एकदा सूर्य आपल्या सात घोड्यांच्या रथाने विश्वाची परिक्रमा करण्यासाठी निघाला. परंतु सूर्यदेवाचे सात घोडे अनेक वर्षे सतत धावल्यामुळे तहानेने व्याकूळ होतात, सूर्यदेव त्यांना पाणी पिण्यासाठी बांधलेल्या तलावाजवळ असतात. पण त्यांना वाटते की वाटेत कुठेही थांबण्याची गरज नाही. त्यानंतर कुंडाजवळ आपल्या रथात काही गाढवे जोडून घेतात आणि पुढे जातात. त्यामुळे त्यांचा वेग मंदावतो. याच काळपासून खरमास हा अशुभ महिना मानला जातो.

काय आहे नक्षत्र

या दिवसाच्या नक्षत्राबद्दल सांगायचे झाले तर हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते.या दिवशी स्थिर योग तयार होत आहे. ज्या दरम्यान केलेले कोणतेही काम स्थिर असते, अशी मान्यता आहे. या दिवशी मूळ नक्षत्र अष्टमी तिथी आहे ज्याला शीतला अष्टमी असेही म्हणतात. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, अशा वेळी जे काम हाती घेतलं जातं, त्यात कोणताही अडथळा येत नाही, त्यामुळे२५ तारखेला योगी आदित्यनाथ आपल्या मंत्रिमंडळासह शपथ घेणार आहेत. २०२४ मध्ये केतूच्या महादशानंतर शुक्राची महादशा सुरु होणार आहे. हा काळ योगी आदित्यनाथ यांच्या आयुष्यातील सर्वात सुवर्ण काळ असेल.

इतर बातम्या

आमदारांना मोफत घरे नाहीच, आमदारांना कितीला पडणार घर?; Jitendra Awhad यांनी सांगितली किंमत

आता जिल्हा परिषदेच्या शाळांवर CCTV ची नजर, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

Lock Upp Show : कंगना रनौत ‘लॉकअप’ बाहेर…, मुंबई विमानतळावर स्पॉट, पाहा फोटो…

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.