AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील 4 दिवस धो-धो… पावसाचा थेट रेड अलर्ट जारी; राज्यात कुठं-कुठं कोसळधारा?

IMD Rain Alert : राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याचे समोर आले आहे, त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील 4 दिवस धो-धो... पावसाचा थेट रेड अलर्ट जारी; राज्यात कुठं-कुठं कोसळधारा?
Maharashtrsa IND Rain AlertImage Credit source: Google
| Updated on: Jul 23, 2026 | 6:24 PM
Share

गेले काही दिवस राज्यातील पानसाने विश्रांती घेतलेली होती, मात्र आता राज्यातील विविध भागात पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरात गेल्या 3 दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसाला सुरूवात झाली आहे. अशातच आता राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याचे समोर आले आहे, त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पावसाबाबत नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट

पुणे हवामान विभागाचे प्रमुख एस डी सानप यांनी राज्यातील हवामानाबाबत माहिती दिली आहे. सानप यांनी सांगितले की, 25 जुलै पर्यंत चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांमधील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मान्सून सक्रिय झाल्याने राज्यातील अनेक धरणे भरण्याची शक्यता आहे. पावसाला सुरवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी कृषीतज्ञांना सल्ला घेऊन पेरणी करावी असे आवाहन सानप यांनी केले आहे. तसेच पावसासंदर्भात माहिती देण्यासाठी भारतीय हवामान विभागाच्या मेघदूत या अँपचा वापर करावा असंही सानप यांनी म्हटलं आहे.

कोकणात 5 दिवस पावसाची शक्यता

दुसरीकडे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने समुद्रात चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. किनारपट्टी भागात मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे किनारपट्टीकडे येत आहे त्यामुळे पुढचे काही दिवस कोकणात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढचे पाच दिवस कोकणात पावसाच्या सरी बरसणार आहेत.

नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग वाढला असल्यामुळे किनारपट्टी भागात ताशी 50 किलोमिटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा आँरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे काजळी, वाशिष्ठी आणि जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य की खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा