Vastu Shastra : प्रचंड कष्ट करूनही व्यवसायात यश मिळत नाहीये का? मग करा हे सोपे उपाय

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे. अनेकदा आपल्या घरात अचानक काही अडचणी निर्माण होतात. अशा प्रकारच्या अडचणी या घरात वास्तूदोष निर्माण झाल्यामुळे देखील निर्माण होऊ शकतात. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : प्रचंड कष्ट करूनही व्यवसायात यश मिळत नाहीये का? मग करा हे सोपे उपाय
vastushtra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 09, 2026 | 10:00 PM

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये, तर अनेकदा काही कारणांमुळे आपल्या घरात नकरात्मक ऊर्जा प्रवेश करते, ज्यामुळे तिचा परिणाम हा तुमच्या घरात असलेल्या सकारात्मक ऊर्जेवर होतो आणि घरातील ऊर्जा संतुलन बिघडते, म्हणजे घरात वास्तुदोष निर्माण होतो. हा वस्तूदोष कसा दूर करायचा? याबद्दल देखील अनेक उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत. जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. तेव्हा घरावर काही संकट येतात, जसं की काहीही कारण नसताना अचानक गृहकलह वाढतो, कुटुंब प्रमुखाचं कुटुंबातील सदस्यांसोबत पटत नाही. एवढंच नाही तर सगळं सुरळीत सुरू असताना अचानक एखादं मोठं आर्थिक संकट निर्माण होतं. व्यवसाय जर सुरळीत सुरू असेल तर अचानक असं काही घडतं की व्यवसायामध्ये यश येत नाही, त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. चला तर मग आज आपण या उपायांबद्दल माहिती जाणून घेऊयात.

तुरटीचा उपाय – जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात यश येत नसेल तर वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तुरटीचे दोन ते तीन खडे घ्या. ते खडे एका लाल कापडात बांधून त्याची पोटली तयार करा आणि ही पोटली तुमच्या दुकानाच्या मुख्य दरवाजाच्या वर अडकून ठेवा, यामुळे तुमच्या दुकानातील सर्व प्रकारचे वास्तूदोष दूर होतील, तुम्हाला तुमच्या व्यवसायामधून अपेक्षित नफा प्राप्त होईल, तसेच तुम्हाला प्रगतीच्या इतर संधी देखील मिळतील, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

लक्ष्मी मातेजी पूजा – तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरी लक्ष्मी मातेचा एक तरी फोटो असावा, लक्ष्मी माता ही धनाची देवता असते, त्यामुळे रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर लक्ष्मी मातेची पूजा करावी तिला एक लाल फूल अर्पण करावं, यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो आणि लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने तुमची भरभराट होते. तुमचा व्यवसाय देखील चांगला चालते.

कुबेराचा फोटो – तुम्ही पैसै कमावत असाल परंतु जर पैसे तुमच्या हातात टिकत नसतील तर त्यासाठी देखील वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तुम्ही तुमच्या घराच्या किंवा दुकानाच्या उत्तर दिशेला भगवान कुबेर यांचा फोटो लावा, यामुळे तुमच्या व्यवसायाची भरभराट होईल, अशी मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us