Vastu Shastra : स्वयंपाक घरात चुकूनही ठेवू नका ही एक वस्तू, कंगाल व्हाल

आपण अशा अनेक छोट्या-छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास त्याच्या प्रभाव हा संपूर्ण कुटुंबावर पडतो, वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष दूर करण्यासंर्दभात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Shastra : स्वयंपाक घरात चुकूनही ठेवू नका ही एक वस्तू, कंगाल व्हाल
वास्तुशास्त्र
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 19, 2025 | 7:05 PM

वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो म्हणजे तुमचं स्वंयपाक घर, कारण याच ठिकाणावरून सतत ऊर्जेचा स्त्रोत वाहत असतो, वास्तुशास्त्रानुसार ऊर्जा ही दोन प्रकारची असते, एक म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि दुसरी नकारात्मक ऊर्जा, जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुमच्या घरात काही समस्या निर्माण होऊ शकतात, जसं की अचानक व्यावसायामध्ये तोटा होणं, एखादं आर्थिक संकट येणं, घरात आजारपण, किंवा काहीही कारण नसताना घरातील सदस्यांसोबत वाद होणं अशी लक्षणं दिसू लागतात. मात्र जेव्हा तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा त्याचा खूपच शुभ परिणाम हा तुमच्या घरावर होत असतो, जसं की घरात सदैव सुख, शांती आणि समृद्धी राहते. नोकरी आणि व्यावसायामध्ये प्रगती होते, घरात सदैव आनंदाचं वातावरण राहते, ऊर्जा सकारात्मक असो किंवा नकारात्मक ही सर्व ऊर्जा तुमच्या स्वयंपाक घरातूनच निर्माण होते, त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाक घराला विशेष महत्त्व आहे.

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या स्वयंपाक घरामध्ये कधीही आरसा ठेवू नये, वास्तुशास्त्रामध्ये आरसा घरात कुठे लावावा यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. मात्र स्वयंपाक घरात आरसा नसावा असं वास्तुशास्त्र सांगतं, तुम्ही जेव्हा तुमच्या स्वयंपाक घरामध्ये आरसा लावता, तेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा परिणाम हा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो. जर स्वयंपाक घरात आरसा लावला तर त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता असते, असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

वास्तुशास्त्रानुसार तुमचं स्वयंपाक घर हे नहेमी अग्नेय दिशेला असावं, अग्नेय दिशेला असलेलं स्वयंपाक घर हे नेहमी शुभ मानलं जातं. कारण अग्नेय दिशा ही अग्नी देवताशी संबंधित आहे. जर तुमचं घर हे अग्नेय दिशेला असेल सतत तुमच्या स्वयंपाक घरातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहीत होते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)