Vastu Shastra : गुढीपाडव्याच्या दिवशी करा हा सोपा उपाय, कर्जातून मिळेल झटपट मुक्ती, पैशांची आवकही वाढेल

गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील एक मोठा सण आहे. या दिवशी गुढी उभारून नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. हिंदू धर्म परंपरेनुसार गुढीपाडव्याला नव्या वर्षाची सुरुवात होते. आज आपण घराला आर्थिक स्थैर्य लाभण्यासाठी गुढीपाडव्याला करण्याचे काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : गुढीपाडव्याच्या दिवशी करा हा सोपा उपाय, कर्जातून मिळेल झटपट मुक्ती, पैशांची आवकही वाढेल
gudi padwa
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 16, 2026 | 9:47 PM

गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील मोठा सण आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. त्यामुळे गुढीपाडव्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जातं. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी गुढीपाडवा हा 19 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. गुढी उभारण्यासाठीचं शुभ मुहूर्त यावेळी 6 वाजून 44 मिनिटांपासून सुरू होतं, तुम्ही 8 वाजून 14 मिनिटांपर्यंत कधीही गुढी उभारू शकता. या दिवशी 6 वाजून 44 मिनिटांपासून ते 8 वाजून 14 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे. दरम्यान गुढी पाडवा हा हिंदू धर्मातील मोठा सण आहे. नवीन वर्षाची सुरुवात आहे. त्यामुळे अनेक जण नवीन वर्षांमध्ये काही संकल्प करत असतात. येणारं वर्ष हे आपल्याला आनंदाचं, सुखाचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावो. घराला आर्थिक स्थैर्य मिळावं अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्यामुळे आज आपण घरातील सुख समृद्धीसाठी गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील मोठा सण आहे. याच दिवसापासून नव्या वर्षाची सुरुवात होते. सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी वास्तुशास्त्रात सांगितल्यानुसार काही सोपे उपाय केल्यास तुम्हाला वर्षभर कधीही पैशांची कमी भासत नाही, तसेच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो. जर तुमच्यावर कर्ज असेल तर त्यातून देखील तुमची सुटका होते. वास्तुशास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी, देवाची पूजा करावी. देवपूजेनंतर एक लाल किंवा पिंपळ वस्त्र घ्यावं. त्यामध्ये थोडेसे तांदूळ, हळकूंड आणि दालचिनीचा एक छोटासा तुकडा टाकावा, तसेच काही कॉइन देखील टाकावेत. त्यानंतर या सर्व वस्तू या वस्त्रामध्ये नीट बांधून घ्याव्यात. स्त्री सुक्ताचा पाठ करावा. त्यानंतर या सर्व वस्तू तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवून द्या.

वास्तुशास्त्रात अशी मान्यता आहे, की या उपायामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होईल. तसेच तुम्हाला पैशांसंबंधी ज्या काही अडचणी आहेत, त्या सर्व अडचणी दूर होतील. तुमच्यावर जर कर्ज असेल तर त्यातून देखील तुम्ही मुक्त व्हाल. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील, आणि तुम्हाला पैशांची कधीही कमी भासणार नाही.यासोबतच तुम्ही धन प्राप्तीसाठी आणखी एक सोपा उपाय करू शकता, तो म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला धनाची देवता कुबेर यांचा फोटो लावू शकता. कुबेराची दररोज पूजा केल्यानं देखील धन प्राप्ती होते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us