Vastu Shastra : तुम्ही देखील ऑफिसच्या डेस्कवर कॅलेंडर ठेवता का? जाणून घ्या काय होतात परिणाम?

वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष दूर करण्याचे वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत, तसेच वास्तुदोष कशामुळे निर्माण होऊ शकतो? त्याची कारणं देखील सांगण्यात आली आहेत. आज आपण ऑफिसच्या डेस्कवर कॅलेंडर ठेवणं शुभ की अशुभ? त्याचे परिणाम काय होऊ शकतात? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : तुम्ही देखील ऑफिसच्या डेस्कवर कॅलेंडर ठेवता का? जाणून घ्या काय होतात परिणाम?
Calendar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 01, 2026 | 7:46 PM

तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. तसेच वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये तुमच्या भोवती ज्या काही वस्तू असतात, त्यातून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा तयार होत असते. अशा काही गोष्टी असतात, ज्या घरात किंवा तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. अशा गोष्टींमुळे कायम तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा राहते आणि तुम्हाला तुमच्या कामात यशाची प्राप्ती होते, तसेच घरात सुख समृद्धी येऊन तुमची भरभराट होते.मात्र अशा देखील काही गोष्टी आहेत, त्या जर तुमच्या भोवती असतील तर त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्यावर होतो. आज आपण जाणून घेणार आहोत, की ऑफीसच्या डेस्कवर कॅलेंडर ठेवणं शुभ आहे की अशुभ? त्याचे परिणाम काय होतात? तसेच ऑफिसच्या डेस्कवर कॅलेंडर ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा कोणती? चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या डेस्कवर कॅलेंडर ठेवणं हे अतिशय शुभ मानलं जातं. कारण कॅलेंडरला प्रगती आणि गतीचं प्रतिक मानलं जातं. जर तुम्ही देखील तुमच्या ऑफिसच्या डेस्कवर कॅलेंडर ठेवत असाल तर ही एक चांगली गोष्ट आहे, कारण यामुळे तुमची प्रगती होते. प्रमोशनचे योग लवकर येतात. तसेच तुमचा आत्मविश्वास देखील वाढतो. कामात प्रगती दिसून येते. याचसोबत अनेक शुभ असे परिणाम तुम्हाला प्राप्त होतात, त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये ऑफिसच्या डेस्कवर कॅलेंडर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अनेकजण आवर्जून आपल्या ऑफिसच्या डेस्कवर कॅलेंडर ठेवत असतात.

कॅलेंडर कोणत्या दिशेला ठेवावे? वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर हे नेहमी ऑफिसच्या डेस्कवर उत्तर दिशेला ठेवावे, कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेराची दिशा आहे. त्यामुळे ऑफिसच्या डेस्कवर नेहमी उत्तर दिशाला कॅलेंडर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुमची आर्थिक प्रगती झपाट्याने होते, तसेच तुमच्या आर्थिक प्राप्तीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे देखील दूर होतात. तुम्ही कॅलेंडर पूर्व दिशेला देखील ठेवू शकतात, पूर्व दिशा ही सूर्य देवतेची दिशा असते, त्यामुळे पूर्व दिशेला कॅलेंडर ठेवणं हे अतिशय शुभ मानलं जातं. कॅलेंडर कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us