
वास्तुशास्त्रानुसार घरात तुळशीचं झाड असणं खूप शुभ आणि पवित्र मानलं जातं. धर्मशास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की घरावर येणाऱ्या प्रत्येक संकटात तुळस आपलं संरक्षण करते. हिंदू धर्मामध्ये तुळशीचं खूप महत्त्व आहे. घरात तुळस लावल्यास सर्व नकारात्मक गोष्टींचा नाश होतो, आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. लोक नियमीतपणे तुळशीची पूजा देखील करतात. असं मानलं जातं की ज्या घरात तुळस आहे, त्या घरावर सतत लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद असतो. मात्र अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुळशीच्या जवळ ठेवू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं, चला तर मग जाणून घेऊयात या गोष्टींबद्दल.
तुळशीजवळ शिवलिंग ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार जीथे तुळस आहे, तिथे शिवलिंग ठेवलं नाही पाहिजे. अनेक लोक तुळशीच्या कुंडीमध्येच शिवलिंग ठेवतात. त्यानंतर शिवलिंग आणि तुळशीची सोबतच पूजा केली जाते. मात्र वास्तुशास्त्रात असं न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.
गणपती आणि तुळशीची पूजा सोबत करू नका
धर्मशास्त्रानुसार तुळस आणि गणपती यांची पूजा सोबत करू नये, एका कथेनुसार भगवान गणपती यांनी तुळशीच्या विवाहाचा प्रस्ताव अमान्य केला होता, मी ब्रह्मचारी असल्याचं त्यांनी सांगितलं. तेव्हा तुळशीने त्यांना दोन विवाहाचा श्राप दिला तर गणपती यांनी देखील तुळशीला एका राक्षसासोबत विवाहाचा श्राप दिला, त्यामुळे गणपती आणि तुळशीचं पूजन सोबत करत नाहीत.
तुळशीच्या जवळ चपला, बूट ठेवू नका
असं मानलं जातं की तुळस ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही जर तुळशीजवळ चपला किंवा बूट ठेवले तर माता लक्ष्मी आणि विष्णू नाराज होतात, घरात वास्तुदोष निर्माण होऊन, आर्थिक संकट येतात.
तुळशीच्या जवळ काटेरी झाडं लावू नका
अशी मान्यता आहे की तुळशीजवळ काटेरी झाडं लावल्यानं घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो, त्यामुळे तुळशीच्या जवळ काटेरी झाडं लावू नयेत.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)