Vastu Shastra: श्रावण महिन्यात दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाता? मग या नियमांचं पालन आवश्य करा

श्रावण महिना हा हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये अत्यंत पवित्र महिना मानला गेला आहे. श्रावण महिना हा भगवान महादेव यांना समर्पित आहे. त्यामुळे या काळात भगवान शिव यांच्या उपासनेचं विशेष महत्त्व आहे. मात्र या काळात काही नियमांचं पालन करणं देखील गरजेचं आहे, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

Vastu Shastra: श्रावण महिन्यात दर सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाता? मग या नियमांचं पालन आवश्य करा
शिवलिंग
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 07, 2026 | 9:39 PM

हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. श्रावण महिना हा भगवान महादेव यांना समर्पित आहे. या महिन्यात महादेवाची उपासना केल्यास भक्ती केल्यास तुम्हाला महादेवांच्या कृपेने इच्छित फळाची प्राप्ती होते, अशी मान्यता आहे. श्रावण महिन्यात जे सोमवार येतात, त्यांना हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. सोमवार हा वार महादेवांना समर्पित आहे, तसेच श्रावण महिना हा देखील महादेव यांना समर्पित आहे. त्यामुळे श्रावणी सोमवार विशेष महत्त्वाचे मानले जातात. अनेकजण या दिवशी मोठ्या भक्ती भावाने उपास करतात, तसेच श्रावणी सोमवारी न चुकता महादेवाचं दर्शन घेतात. परंतु श्रावणी सोमवारी किंवा इतरही वेळी महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचे काही नियम आहेत. वास्तुशास्त्रानुसार या नियमांचं पालन केल्यास महादेवाच्या आशीर्वादाने त्याच्या भक्ताच्या आयुष्यातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात. चला तर मग या नियमांबद्दल वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.

प्रदक्षिणा – तुम्ही जेव्हा महादेवाच्या पिंडिला प्रदक्षिणा मारता तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रदक्षिणा हे नहेमी घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं घालायची आहे, तसेच महादेवाच्या पिंडिला नेहमी अर्धी प्रदक्षिणा मारली जाते, शिवलिंग ओलांडू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. श्रावणी सोमवारी महादेवाच्या पिंडिला प्रदक्षिणा मारल्यास तुमच्या मागची सर्व संकट दूर होतात, असंही वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

फुलं – महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरात गेल्यानंतर कधीही मोकळ्या हाताने जाऊ नका, काही तरी नैवेद्य घेऊ जा, किंवा अगदीच काही नसेल तर कमीत कमी फुलं किंवा बेलाची पानं घेऊन जावेत, महादेवांना बेलाची पानं अतिशय प्रिय असतात, तसेच महादेवांना कधीही लाल फुलं अर्पण करू नयेत, महादेवांना नेहमी पांढरी फुलंच अर्पण करावीत, तसेच दर्शन झाल्यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवावा, असं वास्तुशास्त्र सांगतं.

मंदिरातून घरी परतल्यानंतर लगेचच हात पाय धुवू नका, कारण तुम्ही जेव्हा मंदिरातून घरी येतात, तेव्हा तुमच्यासोबत सकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरात येते. त्यामुळे मंदिरातून घरी आल्यानंतर लगेच हातपाय धुवू नये असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us