AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : संध्याकाळी चुकूनही खरेदी करू नका या वस्तू, तर घरात गरिबी आलीच म्हणून समजा

आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात काही अशा चुका करत असतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोष निवारणासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. संध्याकाळच्यावेळी काही विशिष्ट गोष्टी खरेदी करू नये असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

Vastu Shastra : संध्याकाळी चुकूनही खरेदी करू नका या वस्तू, तर घरात गरिबी आलीच म्हणून समजा
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 06, 2026 | 8:24 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये वास्तुदोष निवारणासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जर एखाद्या व्यक्तीच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला तर त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. जसं की काहीही कारण नसताना घरात भांडणं होतात. पती-पत्नीचं पटत नाही. मुलांचं लक्ष अभ्यासात लागत नाही, सर्व सुरळीत सुरू असताना अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं. व्यापारात नुकसान होतं. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी घरामध्ये ऊर्जेचं संतुलन साधलं गेलं पाहिजे. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो, तेव्हा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आज घरातील वास्तुदोष दूर करण्याचा एक सोपा उपाय आपण जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या संध्याकाळच्या वेळी चुकूनही खरेदी करू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, या ऊर्जेचा थेट परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे, त्याबद्दल.

मीठ – वास्तुशास्त्रानुसार मिठाला लक्ष्मी मातेचं रूप मानलं जातं. त्यामुळे संध्याकाळच्यावेळी कधीही मिठाची खरेदी करू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही संध्याकाळच्यावेळी मिठाची खरेदी करत असाल तर त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, ज्याचा थेट परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो.

झाडू – वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्यावेळी झाडू देखील कधीही खरेदी करू नये, यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होतात, हातात आलेला पैसा टिकत नाही. तसेच घरात खर्चाचं प्रमाण देखील वाढतं. त्यामुळे सायंकाळच्यावेळी झाडू खरेदी करू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

मोहरीचं तेल – वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळच्यावेळी कधीही मोहरीच्या तेलाची खरेदी करू नये, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्याचा मोठा फटका हा तुम्हाला बसू शकतो. घरात आर्थिक समस्या निर्माण होतात, तसेच घरात काहीही कारण नसताना कलह वाढतो, भांडणं होतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

दूध – दूध संध्याकाळ होण्यापूर्वीच खरेदी करून ठेवावं, दूध चुकूनही संध्याकाळच्या वेळी खरेदी करू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, त्यामुळे महत्त्वाच्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...