Vastu Shastra : प्रत्येकाने पाकिटात ठेवाव्यात या चार वस्तू, आयुष्यात कधी पैशांची कमी पडणार नाही

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? या संदर्भातच मार्गदर्शन करण्यात आलेलं नाहीये. तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी येतात, त्या कशा पद्धतीने दूर करता येतील? यासंदर्भात काही सोपे उपाय देखील सांगण्यात आले आहेत.

Vastu Shastra : प्रत्येकाने पाकिटात ठेवाव्यात या चार वस्तू, आयुष्यात कधी पैशांची कमी पडणार नाही
वास्तुशास्त्र
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 19, 2025 | 6:45 PM

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? घराची रचना कशी असावी यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं आहे, धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तुमच्या घरात वास्तूदोष निर्माण होतो. घरात वास्तूदोष निर्माण झाल्यास अनेक संकट येतात. जर घरात वास्तुदोष निर्माण झाला तर तो कसा दूर करायचा? त्यासाठी काय-काय उपाय करायचे? हे देखील वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. अनेकदा असं होतं की आपण प्रचंड कष्ट करतो, पैसा कमावतो, परंतु कमावलेला पैसा आपल्या हात टिकत नाही. पैसा खर्च होतो, कर्ज देखील वाढतं. अशा समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहे, या उपायांमुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते, तसेच तुमच्या आयुष्यात प्रगतीच्या अनेक संधी येतात असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल.

तांदळाचे दाणे – वास्तुशास्त्रानुसार तांदळाच्या दाण्याला वाढीचं प्रतिक म्हणून पाहिलं जातं, त्यामुळे आपल्या पाकिटात नेहमी तांदळाचे दाणे ठेवावेत, या सोप्या उपायामुळे तुम्हाला बरकत प्राप्त होते, कधीही आर्थिक अडचण येत नाही, पाकिट सदैव पैशांनी भरलेलं राहातं.

कुबेर यंत्र – वास्तुशास्त्रानुसार धनाची देवता जशी लक्ष्मी माता आहे, तसं कुबेराला देखील धनाची देवता मानलं जातं, त्यामुळे पाकिटात नेहमी कुबेर यंत्र ठेवावं, यामुळे तुमच्या हातात पैसा टिकून राहतो.

गोमती चक्र – गोमती चक्र हे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे गोमती चक्र पाकिटात ठेवावं असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे, जर तुमच्या पाकिटात गोमती चक्र असेल तर सदैव तुमच्यावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहील.

चांदीचं नाण – पाकिटात नेहमी चांदीचं नाणं ठेवावं, त्यामुळे बरकत येते, पाकिट सैदव पैशांनी भरलेलं राहतं, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)