Vastu Shastra : घराला नजर लागलीये? सर्व गोष्टी वाईटच घडतायेत? मग करा वास्तुशास्त्रातील हा सर्वात प्रभावी उपाय

आपलं सगळं सुरळीत सुरू असताना अचानक आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते. आपल्याला अपेक्षित असलेल्या गोष्टी घडत नाहीत, घरात कारण नसताना वादविवाद होतात. त्यावर वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Shastra : घराला नजर लागलीये? सर्व गोष्टी वाईटच घडतायेत? मग करा वास्तुशास्त्रातील हा सर्वात प्रभावी उपाय
vastushtra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 05, 2026 | 9:37 PM

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या सभोवती जसं वातावरण असतं तसा त्याचा प्रभाव हा तुमच्यावर पडत असतो. जर तुमच्या भोवती सतत नकारात्मक वातावरण असेल तर त्याचा तुमच्यावर देखील नकारात्मकच प्रभाव पडतो. जर सकारात्मक वातावरण असेल तर निश्चितच त्याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडणार. मात्र तरी देखील अनेकदा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की आपल्याला नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो, या संकटातून बाहेर पडण्यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुम्हाला एखाद्याची नजर लागते, तेव्हा त्याचा फटका तुम्हाला बसतो. तुम्हाला अपेक्षित असलेली कामे घडून येत नाहीत. ऑफिसमध्ये कामात मन लागत नाही, अचानक आर्थिक नुकसान होतं, कारण नसताना वाद होतात, त्यावर देखील वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

नजर लागते म्हणजे नेमकं काय होतं?

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या जवळची किंवा परिचयामधील व्यक्ती जेव्हा तुमची प्रगती पाहून तुमचा मत्सर करते, जेव्हा ती व्यक्ती तुमच्याबद्दल सतत वाईट चिंतित राहते, तेव्हा त्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम हा तुमच्यावर होण्यास सुरुवात होते. यामुळे होत काय की तुम्हाला जी अपेक्षित कामं आहेत, ती पूर्ण होत नाहीत, अचानक आर्थिक नुकसान होऊ शकतं, कामात लक्ष लागत नाही. इतरही अनेक प्रकारे याचा तुम्हाला फटका बसू शकतो.

उपाय

वास्तुशास्त्रामध्ये यावर एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे, जर तुम्हाला वाटत असेल आपल्याला कोणाची नजर लागली आहे, तर अशावेळी एका छोट्या डबीमध्ये मीठ भरून ते तुमच्या कामाच्या ठिकाणी ड्रॉवरमध्ये ठेवून द्या. तसेच दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपल्या तळहातावर थोडसं मीठ घ्या, ते दोन्ही तळहाताला व्यवस्थित चोळा आणि नंतर आपले हात धुवा यामुळे नजरदोष दूर होऊन, सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा नाश होईल, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us