Vastu Shastra : प्रत्येकानं करावेत असे चार सोपे वास्तु उपाय, नशीब घोड्यासारखं धावेल

घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास अनेक अडी अडचणी निर्माण होतात, वास्तुदोष दूर कसा करायचा? याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : प्रत्येकानं करावेत असे चार सोपे वास्तु उपाय, नशीब घोड्यासारखं धावेल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 26, 2025 | 5:13 PM

प्रत्येकाला अशी इच्छा असते की घरात सुख, शांती राहावी, घराची भरभराट व्हावी परंतु घरात जेव्हा वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घर अस्थिर बनतं, छोट्या-छोट्या गोष्टींवरून घरात भांडणं होतात, घरात कायम आर्थिक अडचणी येतात. त्यामुळे घरात जर वास्तुदोष असेल तर तो दूर करणं गरजेचं असतं वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगीतले आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष दूर करू शकता, तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सकारात्मक ऊर्जेचं आगमन होईल, अशाच काही सोप्या उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

घराच्या मुख्य दरवाजा समोर तुळशीचं झाड

घराच्या मुख्य दरवाजा समोर तुळशीचं झाडं लावणं हे खूपच शुभ मानलं जातं. तुळस ही भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांना अत्यंत प्रिय असते, ज्या घरात तुळस असते त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचा आशीर्वाद राहतो. घरात कधीच कोणत्या अडी अडचणी येत नाहीत. सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात, तिजोरी सदैव पैशांनी भरलेली राहते. फक्त तुळस लावताना एक गोष्ट लक्षात घ्या, तुळशी वृंदावनाचं तोंड हे पूर्व दिशेलाच असावं.

झोपण्याची दिशा

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही कोणत्या दिशेकडे तोंड करून झोपता? याचा तुमच्या आरोग्यावर खूप प्रभाव पडतो. जर तुम्ही चुकीच्या दिशेला झोपत असाल तर अनेक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार कधीही उत्तर दिलेशा तोंड आणि दक्षिण दिशेला पाय करू झोपू नये. कारण उत्तर दिशेला पृथ्वीचं ध्रुवीय क्षेत्र मानलं जातं. त्यामुळे या दिशेची ऊर्जा ही प्रचंड जास्त असते, त्यामुळे त्याचा परिणाम हा तुमच्या शरीरावर होऊ शकतो.

घड्याळाची दिशा

वास्तुशास्त्रानुसार घड्याळाला प्रगती आणि गतीचं प्रतिक मानलं गेलं आहे. त्यामुळे घरात तुम्ही कोणत्या दिशेला घड्याळ लावता हे देखील महत्त्वाचं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरातील घड्याळ हे नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं, जर घड्याळ पूर्व दिशेला असेल तर घरात सकारात्मक ऊर्जा येते, घरात सुख, शांती राहते. तर उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असल्यामुळे जर घड्याळ उत्तर दिशेला लावलं तर त्यामुळे तुमच्या घरात कधीही पैशांची कमी जाणवत नाही.

तिजोरीची दिशा – कुठल्याही घरामध्ये तिजोरीला अत्यंत महत्त्व असतं, तिजोरी योग्य स्थानावर ठेवली गेली पाहिजे, वास्तुशास्त्रानुसार तिजोरी ही नेहमी घराच्या उत्तर दिशेला असावी, कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते, त्यामुळे तुमच्या घरात सदैव पैशांची आवक होत राहते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)