Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठताच जर हे आवाज कानी पडले तर समजून जा, दिवसभरात नक्की आनंदाची बातमी मिळणार

वास्तुशास्त्रानुसार असे काही आवाज असतात, ते जर सकाळी झोपेतून उठल्या -उठल्या तुमच्या कानी पडले तर ते अतिशय शुभ मानले जातात. तुम्हाला दिवसभरात एक तरी चांगली आनंदाची बातमी मिळणार असा त्याचा अर्थ होतो. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे त्याबद्दल?

Vastu Shastra : सकाळी झोपेतून उठताच जर हे आवाज कानी पडले तर समजून जा, दिवसभरात नक्की आनंदाची बातमी मिळणार
Vastu Shastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 24, 2026 | 8:57 PM

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमच्या घराची रचना कशी आहे? याबद्दलच माहिती देण्यात येत नाही, तर तुमच्या घरात काही वास्तुदोष निर्माण झाले असतील तर त्यावर देखील उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार असे काही आवाज असतात, ते जर तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुमच्या कानी पडले तर तुमचा दिवस आनंदात जातो. तुमचं मन दिवसभर सकारात्मक विचार करतं. तसेच दिवसभरात तुम्हाला एखादी का होत नाही,परंतु गुडन्यूज मिळते. जर तुम्हाला एखादं महत्त्वाचं काम करायचं असेल आणि ती विशिष्ट ध्वनी तुमच्या कानावर पडली तर तुमचं ते काम होण्याची शक्यता वाढते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. आज आपण अशाच काही आवाजांबद्द माहिती जाणून घेणार आहोत.

शंख नाद – शंखाच्या आवाजाला शंख नाद असं म्हटलं जातं. शंखाचा आवाज काणी पडलं हे अतिश्य पवित्र आणि शुभ आहे. जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी झोपेतून उठता आणि तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू येतो याचा अर्थ तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामात निश्चितपणे यश मिळणार असा होतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कारण वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये शंखाला विजयाचं प्रतिक मानलं जातं.

मंदिरातील घंटेचा आवाज – जर तुमच्या कानी मंदिरातील घंटेचा आवाज आला तर तो तुमच्यासाठी एक शुभ संकेत असतो. याचा अर्थ असा की तुम्हाला देवी -देवतेचा आशीर्वाद मिळाला आहे. तुमची सर्व कामे त्यामुळे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यानंतर लगेचच मंदिरातील घंटेचा ध्वनी कानावर पडला तर ते अतिशय शुभ मानलं जातं.

कोकीळेचा आवाज – कोकीळेचा आवाज हा सुमधूर असतो, सकाळी झोपेतून उठल्यानंतर जर तुमच्या कानी कोकीळेचा आवाज पडला तर तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तुम्हाला प्रसन्न वाटतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us