Vastu Shastra : वास्तुदोषापासून मुक्ती हवी आहे, मग या पाच चुका टाळाच

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे, जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा तुमच्यासह तुमच्या कुटुंबावर पडतो, आणि अनेक समस्या निर्माण होतात, वास्तुदोष निर्माण होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : वास्तुदोषापासून मुक्ती हवी आहे, मग या पाच चुका टाळाच
vastushtra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 02, 2026 | 9:16 PM

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, जे प्रामुख्यानं सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा या दोन प्रमुख घटकांवर काम करतं, वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा त्याचा परिणाम हा तुमच्या एकट्यावरच होत नाही तर तो तुमच्या कुटुंबावर देखील होतो. त्यालाच आपण वास्तुदोष देखील म्हणतो, जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा अचानक तुमच्या व्यवसायामध्ये मोठं नुकसान होणं, करिअरमध्ये अडथळे निर्माण होणं, अचानक एखादं मोठं आर्थिक संकट, कितीही प्रयत्न केले तर कर्ज न फिटणं, कुटुंबात आजारपण, तसेच काहीही कारण नसताना घरात सारखे भांडणं होणं अशी लक्षण दिसू लागतात. या उलट सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो, ज्या घरात सकारात्मक ऊर्जा असते, त्या घरावर कधीही संकट येत नाहीत, घराला स्थौर्य प्राप्त होते, तसेच आरोग्याची स्थिती देखील उत्तम राहते, वास्तुदोष टाळण्यासाठी काय करावं हे जाणून घेऊयात.

खरकटी भांडी- रात्री जेवल्यानंतर घरात कधीही खरकटी भांडी तसेच किचनमध्ये पडू देऊ नका, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, रात्री जेवण झाल्यानंतर सर्व भांडी धुवून स्वच्छ करा. यामुळे तुमच्या घरात कायम आर्थिक बरकत राहते.

जेवताना या चुका करू नका – जेवताना कधीही पलंगावर बसून जेवू नका, तसेच ताटामध्ये जेवण टाकू नका, तसेच जेवण झाल्यानंतर ताटात हात धुणे टाळा, यामुळे लक्ष्मी माता आणि अन्नपूर्णा माता नाराज होते, घरात वास्तुदोष निर्माण होतो.

देवघर -तुमचं देवघर हे कधीही किचन जवळ नसावं, कारण त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, त्याचा परिणाम हा तुमच्यासह तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. तुम्ही जेव्हा जेवण बनवता तेव्हा किचनमधून विविध प्रकारची ऊर्जा उत्सर्जित होत असते, तर देवघरातून निघालेली ऊर्जा ही कायम सकारात्मक ऊर्जा असते, त्यामुळे किचनजवळ देवघर नसावं.

पूर्वजांचे फोटो – तुमच्या पूर्वजांचे फोटो कधीही देवघरात ठेवू नका, पूर्वजांचे फोटो हे नेहमी घराच्या दक्षिण भिंतीलाच लावावेत, जर इतर ठिकाणी लावले तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

सध्यांकाळच्यावेळी चुकूनही मीठ, कात या गोष्टींचं दान करू नका, तसेच सायंकाळच्या वेळी चुकूनही झोपू नका, यामुळे देखील घरात वास्तुदोष निर्माण होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us