
वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं असतात, जी घरात लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. या झाडांमुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरामध्ये काही वास्तूदोष निर्माण झाले असतील तर ते देखील दूर होतात. उदाहरण द्यायचं झालं तर तुळशीचं झाड, तुळस ही भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं सर्वात प्रिय झाड आहे. ज्या घरात तुळस असते, त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचा आशीर्वाद असतो. अशा घरात कधीही पैशांची कमी राहत नाही. त्याचप्रमाणे मनी प्लांटचं देखील आहे, मनी प्लांटच्या रोपाला वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये देखील महत्त्व आहे. हे झाड घरात लावल्यास पैसा घराकडे आकर्षित होतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे हे झाडं अतिशय शुभ मानलं जातं. परंतु कोणतंही झाडं लावताना त्याची दिशा लक्षात घेणं हे देखील वास्तुशास्त्रानुसार खुप महत्त्वाचं असतं, तरच अपेक्षित परिणाम साध्य होतो.
परंतु वास्तुशास्त्रामध्ये अशी देखील काही झाडं सांगण्यात आली आहेत, जी घरात लावणं अत्यंत अशुभ मानलं जातं. जसं की कोणतंही काटेरी झाड घरात नसू नये, जर तुम्ही गुलाब वगळता कोणतंही काटेरी झाडं घरात लावलं तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात. घरावर आर्थिक संकट येतात. काहीही कारण नसताना भांडण होतात. त्यामुळे घरात कधीही काटेरी झाडं न लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे, आज आपण जाणून घेणार आहोत, घरात बांबूचं झाडं लावणं शुभ आहे की अशुभ?
वास्तुशास्त्रानुसार घरात बांबूचे झाडं लावणं शुभ मानण्यात आलं आहे. कारण बांबू हा वृक्ष पृथ्वी, आकाश, वायू आणि अग्नी या सर्वांचं प्रतिक मानला जातो. त्यामुळे घरात बांबूच रोप लावणं शुभ मानलं जातं, शक्यतो बांबूचं रोप हे पाण्यात लावावावं, घराच्या उत्तर किंवा पश्चिम दिशेला हे रोप लावणं शुभ मानलं जातं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)