Vastu Shastra : कर्ज फिटता फिटत नाहीये? वाढतच चाललंय? मग करा वास्तुशास्त्रामधील हे सोपे उपाय
अनेकदा आपण प्रचंड कष्ट करतो, परंतु आपल्या हातात पैसा टिकत नाही. कर्ज देखील फिटत नाही. आपल्या घरात असलेल्या वास्तुदोषामुळे या समस्या निर्माण होऊ शकतात. अशा संकटांमधून सुटका मिळवण्यासाठी तसेच कर्जमुक्तीसाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

काही जणांसोबत असं होतं की, त्यांच्या हातामध्ये पैसाच टिकत नाही. ते पैसा कमवण्यासाठी प्रचंड कष्ट करतात. परंतु हातात आलेला पैसा कोणत्या न कोणत्या कारणामुळे लगेच खर्च होतो. महिन्याच्या शेवटी बँक अकाऊंट रिकामं असतं. अशा परिस्थितीमध्ये अडचणी आणखी वाढतात. काय करावं ते कळत नाही. तसेच एखाद्यानं जर कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज कमी होण्याऐवजी वाढतच जातं, माणसाच्या आयुष्यात अशी परिस्थिती का निर्माण होते? तर त्यामागे विविध कारणं असू शकतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जेव्हा वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा तुमच्या आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
घरात आलेला पैसा टिकण्यासाठी तसेच कर्जा लवकरात लवकर फिटावं यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. आज आपण अशाच काही सोपे उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. या उपायांमुळे एक तर तुमच्या घरात पैसा टिकण्यास मदत होईल, दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्यावर कर्ज असेल तर ते देखील कमी होईल, असा दावा वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आला आहे.
मिठाचा उपाय – वास्तुशास्त्रामध्ये सधैव मिठाला खूप महत्त्व आहे. जर तुमच्या हाता पैसा टिकत नसेल तर वास्तुशास्त्रामध्ये मीठाचा एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. दररोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर नित्यनियमाने पाण्यात थोडसं मीठ टाकून दाराचा उंबरा सधैव मिळाच्या पाण्याने पुसून घ्या या उपायामुळे तुमच्या प्रगतीच्या मार्गातील सगळे अडथळे दूर होतील.
घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो – तुमच्या घराची जी उत्तर दिशा आहे, त्या दिशेच्या भिंतीला कुबेराचा फोटो लावावा. कुबेर ही धनाची देवता आहे. या उपायामुळे तुमचे पैशांसंदर्भातील सर्व अडथळे दूर होतील. घरात सुख, समृद्धी येईल आणि तुमच्यावरचं कर्ज देखील दूर होईल, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)