वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर दिशेला कधीही ठेवू नका या 5 वस्तू; आयुष्यात येऊ शकतात समस्या
वास्तूशास्त्रानुसार घरातील उत्तर दिशा ही कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. अशावेळी त्या दिशेला काही गोष्टी ठेवणे टाळावे अन्यथा त्याच्या परिणाम घरातील वातावरणावर तर होतोच पण आर्थिक अडचणीही निर्माण होतात.

वास्तू शास्त्रात घराबाबत अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या जातात ज्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील बऱ्याच समस्या दूर करू शकतो, किंवा वास्तूदोष समजू शकतो. वास्तूशास्त्रात घरातील वस्तूंपासून ते प्रत्येक दिशांपर्यंत सर्वकाही सांगितलं गेलं आहे.यातीलच एक म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घरातील उत्तर दिशेला काही गोष्टी ठेवण्यास मनाई केली गेली आहे. घरात कोणत्या दिशेला काय ठेवावे याबद्दल एक विशेष श्रद्धा आहे. वास्तुशास्त्रात घराच्या दिशांबाबत अनेक प्रकारचे सल्ले आणि सूचना पाहायला मिळतात. वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवणारे लोक अनेकदा घरातील दिशांबाबत विशेष काळजी घेताना दिसतात.
उत्तर दिशेला काही वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते,
उत्तर दिशेबद्दल बोलायचे झाले तर उत्तर दिशेला कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. ही दिशा ज्ञान, बुद्धी आणि सकारात्मकतेशी संबंधित आहे. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर दिशेला काही वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी बाधा येऊ शकते आणि गरिबी देखील येऊ शकते. घराच्या उत्तर दिशेला ठेवल्यास कोणत्या गोष्टी वास्तुदोष निर्माण करतात ते जाणून घेऊयात.
घराच्या उत्तर दिशेला ठेवू नये अशा गोष्टी
अवजड वस्तू ठेवू नये
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या उत्तर दिशेला जड वस्तू ठेवणे टाळावे. ही दिशा भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची दिशा मानली जाते. असे म्हटले जाते की या दिशेला अवजड वस्तू ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येण्यास अडथळे येतात. म्हणून, ही दिशा स्वच्छ आणि रिकामी ठेवावी. आणि कोणती वस्तू ठेवायचीच असल्यासं ती जास्त जड असू नये याची काळजी घ्यावी.
चप्पल-बूट
उत्तर दिशेला देव-देवतांची दिशा असल्याने बूट आणि चप्पल ठेवणे निषिद्ध मानले जाते. असे म्हटले जाते की या दिशेला बूट आणि चप्पल ठेवणे म्हणजे देव-देवतांचा अपमान आहे. त्याचबरोबर या दिशेला चप्पल ठेवल्याने घरात आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. तसेच घरात नकारात्मक उर्जेचा प्रवेश होतो आणि वास्तु दोषांमुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये त्रास होतो.
तुटलेल्या वस्तू
तुटलेल्या वस्तूंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच तुटलेली किंवा भंग पावलेली कोणतीही वस्तू मुळातच घरात ठेवणे अशुभ मानली जाते. त्यामुळे एकतर तुटलेल्या वस्तू कधीही उत्तर दिशेला ठेवू नयेत. आणि मुख्यत: घरातही ठेऊ नयेत. तुटलेल्या वस्तू घरातून ताबडतोब काढून टाकाव्यात.
कचराकुंडी
असे म्हटले जाते की उत्तरेकडे कचऱ्याचा डबा ठेवमे टाळावे. वास्तुशास्त्रानुसार, या दिशेने कचराकुंडी ठेवू नये आणि ही दिशा शक्य तितकी स्वच्छ ठेवली पाहिजे. ज्यामुळे घरात सकारात्मक उर्जेच्या प्रवेशात अडथळा येऊ शकतो. म्हणून, कचराकुंडी नेहमी घराच्या आग्नेय-पूर्व दिशेला ठेवावी
शौचालय
उत्तरेकडे शौचालय बांधणे टाळावे. या दिशेने शौचालय असणे चांगले मानले जात नाही. शौचालय हा घराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. वास्तुशास्त्रानुसार शौचालय नेहमी घराच्या नैऋत्य दिशेला बांधले पाहिजे. जर शौचालय उत्तर दिशेला बांधलेले असेल तर आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
भिंत नसावी
या दिशेला धन आगमनाची दिशा म्हणतात. धन आगमनाची दिशा असल्याने, उत्तर दिशेला भिंत बांधणे योग्य नाही. असे म्हटले जाते की या दिशेला दरवाजे किंवा खिडक्या असाव्यात. कारण जसं वास्तूशास्त्रात म्हटल्याप्रमाणे ही दिशा लक्ष्मी आणि कुबेरांची आहे अशात जर तिथे भिंत असेल तर तो अडथळा ठरेल.म्हणून उत्तरेला नेहमी खुली जागा असावी असं म्हटलं जातं.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )
