Vastu Shastra : कधीच कोणाकडून मोफत घेऊ नका या तीन वस्तू, घरात पैसा टिकणार नाही

वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू असतात, ज्या कधीही इतरांकडून मोफत घेतल्या नाही पाहिजेत. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून अशा वस्तू मोफत घेतात, तेव्हा समोरच्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये किंवा तुमच्या घरात प्रवेश करते.

Vastu Shastra : कधीच कोणाकडून मोफत घेऊ नका या तीन वस्तू, घरात पैसा टिकणार नाही
money
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 10, 2026 | 7:58 PM

घरात सुख शांती राहावी, कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम भावना वाढावी. यासाठी अनेक लोक वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले विविध उपाय करत असतात. वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? तुमच्या घराची रचना कशी असावी? कोणत्या दिशेला काय असावं? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये. तर लोकांकडून कोणत्या वस्तू घ्याव्यात आणि कोणत्या वस्तू घेऊ नयेत. कोणत्या वस्तू कोणत्या वेळी घ्याव्यात याबद्दल देखील मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू असतात, ज्या कधीही इतरांकडून मोफत घेतल्या नाही पाहिजेत. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून अशा वस्तू मोफत घेतात, तेव्हा समोरच्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये किंवा तुमच्या घरात प्रवेश करते. नकारात्मक ऊर्जेमुळे वास्तुदोष निर्माण होतात. चला तर मग जाणून घेऊयात, अशा नेमक्या कोणत्या वस्तू आहेत, ज्या कधीही कोणाकडूनही घेतल्या नाही पाहिजेत.

रुमाला घेऊ नका – चाणक्य म्हणतात एखाद्या व्यक्तीकडून कधीही मोफत रुमाल घेऊ नका, तसेच समोरच्या व्यक्तीला भेट म्हणून देखील कधीही रूमाल देऊ नका. यामुळे तुमच्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडू शकतो. तसेच तुम्ही ज्याला रुमाल दिला आहे, त्याच्या आणि तुमच्या नात्यामध्ये देखील कटुता येऊ शकते. त्यामुळे कधीही कोणालाही रुमाल देऊ नये, किंवा कोणाकडून रुमाल फ्री मध्ये देखील घेऊ नये, असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

Loading...

मीठ – मीठाचा संबंध हा शनि देवांशी आहे. त्यामुळे कोणाकडून मीठ मोफत घेणं किंवा त्याला देणं हे शुभ मानलं जात नाही. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, वास्तुदोष निर्माण होतो. जेव्हा एखाद्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा त्याला पैशांशी संबंधित अडचणी जाणवू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून मीठ घेण्याची गरजच लागली तर अशावेळी त्या व्यक्तीला दुसरी कोणती तरी वस्तू द्यावी आणि मगच मीठ घरी आणावं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

लोखंड – याचा संबंध देखील शनि देवाशी आहे. त्यामुळे कधीही कोणकडून देखील लोखंड मोफत घेऊ नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. ज्याचा परिणाम हा तुमच्यावर होऊ शकतो. लोखंड हे नेहमी पैसे देऊच खरेदी करावं, यामुळे घरात वास्तूदोष निर्माण होत नाही, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us