Vastu Shastra : झोपेतून उठताच कधीही पाहून नका या पाच वस्तू; संपूर्ण दिवस जाईल खराब, घरात येते नकारात्मक ऊर्जा

वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या कधीही झोपेतून उठल्यानंतर लगेच पाहू नये, यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, तसेच तुमचा संपूर्ण दिवस खराब जाऊ शकतो. तुमची चिडचिड होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

Vastu Shastra : झोपेतून उठताच कधीही पाहून नका या पाच वस्तू; संपूर्ण दिवस जाईल खराब, घरात येते नकारात्मक ऊर्जा
vastushtra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 24, 2026 | 8:31 PM

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर पहिल्यांदा ज्या गोष्टी पहाता, त्या गोष्टींमधून परावर्तित होणार्‍या ऊर्जेचा प्रभाव हा दिवसभर तुमच्या मनावर राहतो. जसं की ज्या गोष्टींमधून सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते, अशा काही गोष्टी सकाळी-सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुमच्या दृष्टीस पडल्या तर त्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस मोठ्या आनंदात जातो. तुमची महत्त्वाची कामं मार्गी लागतात. घरात सकारात्मक ऊर्जा राहते. परंतु याउलट तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून उठल्यानंतर अशा काही गोष्टी पहाता ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, अशा गोष्टींमुळे तुमचा दिवस खराब जातो, तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे तुमची चिडचिड वाढते. या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत? आणि वास्तुशास्त्र काय सांगतं? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आरसा – सकाळी उठल्यानंतर कधीही आरसा पाहू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुम्ही जेव्हा झोपेतून उठता तेव्हा तुमच्यामध्ये प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते, आणि जेव्हा तुम्ही तुमचा चेहरा आरशात पहाता, तेव्हा ही ऊर्जा रिफेक्ट होते, त्यामुळे झोपेतून उठल्यानंतर कधीही आरसा पाहू नये, असं वास्तुशास्त्रत सांगण्यात आलं आहे.

खरकटी भांडी – अनेकांना सवय असते, रात्री जेवण झाल्यानंतर खरकटी भांडी स्वच्छ न करता, ती तशीच किचनमध्ये पडू दिली जातात, मात्र यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, झोपेतून उठव्यानंतर अशी खरकटी भांडी लगेच पाहू नयेत, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

हिंस्त्र प्राण्यांचे फोटो – तुम्ही जेव्हा सकाळी झोपेतून उठता तेव्हा कधीही सर्वात आधी हिंस्त्र प्राण्यांचे फोटो पाहू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे दिवसभर तुमच्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहतो आणि तुमच्या मनाची चिडचिड होते.

बंद पडलेलं घड्याळ – घड्याळाला गती आणि प्रगतीचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे घरात कधीही बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये, तसेच झोपेतून उठल्यानंतर कधीही बंद पडलेलं घड्याळ देखील पाहू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

काटेरी झाडं – वास्तुशास्त्रानुसार झोपेतून उठल्यानंत कधीही काटेरी झाडं किंवा त्यांचे फोटो पाहू नयेत, यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us