Vastu Shastra : घरात कधीच लावू नका हे तीन झाडं, अन्यथा घरात भांडणं सुरू झालेच समजा

वास्तुशास्त्रानुसार झाडांचा देखील आपल्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं सांगण्यात आली आहेत, जी घरात न लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे घरात काहीही कारण नसताना वाद वाढू शकतात.

Vastu Shastra : घरात कधीच लावू नका हे तीन झाडं, अन्यथा घरात भांडणं सुरू झालेच समजा
vastu shastra
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 14, 2026 | 8:41 PM

वास्तुशास्त्रानुसार आपल्या आसपास ज्या काही वस्तू आहेत, त्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव हा आपल्यावर पडत असतो. केवळ वस्तूच नाही तर झाडांचा देखील आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो. अशी काही झाडं असतात जी घरात लावणं हे वास्तुशास्त्रामध्ये अतिशय शुभ मानलं गेलं आहे. अशी झाडं जर आपण आपल्या घरात लावली तर त्यामुळे आपली भरभराट होते, घरात सुख, शांती, समृद्धी येत. घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं. मात्र या उलट अशी देखील काही झाडं असतात जी घरात लावणं हे अशुभ माण्यात आलं आहे. अशी झाडं जर आपण आपल्या घरात लावली तर त्यामुळे काहीही कारण नसताना अचानक घरात वादविवाद सुरू होतात. अचानक एखादं मोठं आर्थिक संकट निर्माण होतं. हा त्या झाडाच्या ऊर्जेचा प्रभाव असतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. आज घरात कोणती झाडं लावू नये, याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

पिंपळाचं झाडं- हिंदू धर्मामध्ये पिंपळ्याच्या झाडाला खूप महत्त्व आहे. पिंपळाचं झाड हे पवित्र माण्यात आलं आहे. या झाडामध्ये दैवी शक्ती असते, असं मानलं जातं. तसेच तुम्ही जर नियमित पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला आणि प्रदक्षिणा घातल्या तर तुमचे सर्व प्रकारचे दोष दूर होतात. मात्र तरी देखील पिंपळाचं झाड हे कधीही घरात असू नये असं मानलं जातं. कारण वास्तुशास्त्रानुसार पिंपळ्याच्या झाडाची सावली कधीही घरावर पडू नये. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो.

चिंचेच झाडं हे कधीही घरात किंवा घराच्या परिसरात लावू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कारण चिंचेच्या झाडाची सावली ज्या घरावर पडते, त्या घरात काहीही कारण नसताना गृहकलह सुरू होतो. पती-पत्नीमध्ये मतभेद होतात. घर अशांत राहतं.

काटेरी झाडं – वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही काटेरी झाडं लावू नयेत, जसं की निवडूंग किंवा इतर काटेरी झाडं, याचा पती-पत्नीच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि घरात काहीही कारण नसताना वाद सुरू होतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us